-पेट्रोल मध्ये पाणी निघल्यामुळे वाहनधारक तक्रार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सोळंके पेट्रोल पंपावर एका दुचाकी चालकाने 400 रुपयाचे पेट्रोल आज (ता. 08) सकाळी टाकले होते, परंतू यात पाणी निघल्याने संबंधित वाहन चालक तक्रार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. यामुळे संबंधित पेट्ोल पंपावर भेसळ होतेय की काय हा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
शहरातील श्री बचुटे दुचाकी चालक यांनी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील सोळंके पंपावर 400 रुपयांचे पेट्रोल टाकले होते, परंतू यात भेसळ असल्यामुळे त्यांची दुचाकी बंद पडली. यानंतर त्यांनी त्यांची दुचाकी गॅरेज वर नेल्यानंतर पेट्रोलच्या टाकीत मोठ्या प्रमाणात पाणी निघाले, यानंतर त्यांनी टाकीतील पेट्ोल दोन बॉटल मध्ये भरुन तक्रार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. पेट्रोल मध्ये पाणी मिक्स असल्याचा आरोप श्री बजुटे यांनी केल्यामुळे सोळंके पंपावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.