भारत जोडो यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा- खा. रजनीताई पाटील
बीड :- काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो अभियान सुरू केले असून या अभियानाला जागोजागी लाखोंच्या जनसमुदायाचा पाठिंबा मिळत आहे. भारत जोडो अभियान यात्रा 8 ते 9 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात पोहोचत आहे. त्यानिमित्त बीड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी या यात्रेत सामील होणार होणार आहेत. त्या संदर्भात खासदार रजनीताई पाटील यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत या यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला त्यांनी उपस्थिती दर्शवत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल. विमा कंपनीने शेतकऱ्याला झुलवत ठेवले तर भाजप हे आभासी सरकार असून ते मदतीचा आव आणत आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला कसलीही मदत केली नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेसच्या नेत्या रजनीताई पाटील जिल्ह्यात डेरे दाखल झाल्या सकाळी पालकमंत्री आतून सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विमा कंपनीने ऑफलाईन अर्ज स्वीकारून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तात्काळ मदत मिळावी अशी भूमिका घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद परिषद घेतली यावेळी त्यांनी विमा कंपनी शेतकऱ्यांना कशी लुबाडते याची माहिती देत भाजप सरकार केवळ आभासी असून शेतकऱ्यांप्रती कसलीही संवेदनशीलता त्यांच्यात नाही केवळ मदतीचा आव आणला जात असल्याचे रजनीताई पाटील यांनी सांगितले त्याचबरोबर काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असून बीड जिल्ह्यातून या यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी होत असल्याचे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या की आमचे नेते राहुलजी गांधी हे तिरंगा ध्वज घेऊन निघाले आहेत ते तब्बल 3500 किलोमीटर पायी चालून ही यात्रा यशस्वी करत आहेत. त्यांचा प्रवास तब्बल 150 दिवसाचा आहे महाराष्ट्रामध्ये ते 14 ते 15 दिवस असणार आहेत यादरम्यान नऊ नोव्हेंबरला बीडचे समविचारी नागरिक या यात्रेत सामील होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य दादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, नवनाथ थोटे, पशुपतिनाथ दांगट, जिल्हा सरचिटणीस प्रविणकूमारजी शेप,प्रकाश मुंडे, लक्ष्मण दादा पोळ, ठोंबरे दादा, दादासाहेब तासतोडे, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, गेवराई तालुकाध्यक्ष महेश बेद्रे, पाटोदा तालुका अध्यक्ष राहुल जाधव, परळी तालुकाध्यक्ष अनिल जाधव, रोजगार स्वयंम रोजगार प्रदेश सरचिटणीस गणेश जवकर,ओबीसी बीड जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव,प्रा अशोक देशमुख, गणेश करांडे, डॉ. जयप्रकाश आघाव, श्यामसुंदर जाधव, पाटोदा नगरसेवक उमर चाऊस, बीड शहराध्यक्ष परवेज कुरेशी, शिरूर शहराध्यक्ष असिफ शेख, युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे,असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष संतोष निकाळजे, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, राहुल टेकाळे, स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष विष्णू मस्के, बीड शहराध्यक्ष शेख करीम, सिराज पटेल, कानिफनाथ विघ्ने, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल पाठक, बबलू भाई, कपिल मस्के, रणदिवे सर, हरी सावंत,अशोक केकन,बहादूर भाई,शिवाजी देशमुख, दीपक सिरसाट, हलगे आप्पा, रणजित देशमुख,प्रा.शिवाजी रुपनर,अफरोज तांबोळी,करामा चाऊस,बाळासाहेब अतकारे,आष्टी तालुकाध्यक्ष रवी काका ढोबळे, केज तालुकाध्यक्ष अमर भैय्या पाटील,कपिल मस्के,रोहिदास तात्या निर्मळ, माजलगाव तालुकाध्यक्ष महावीर काका मस्के,गणेश गंगणे, नवनाथ गंगणे,प्रताप मोरे सर,यांच्यासह बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संभाजी जाधव यांनी केले.
सर्वसामान्य नागरिकांसह काँग्रेसचा कार्यकर्ता भारत जोडो यात्रेत सामील होणार- जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख
भाजपा सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्यावर नाराजगी आहे. या नाराजीचा सूर म्हणजे आमचे नेते राहुलजी गांधी यांना मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसून येतो. आपल्या बीड जिल्ह्यातील गाव, वाडी, वस्ती, तांड्यावरील सर्वसामान्य नागरिकांसह काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. भारत जोडो अभियानात लाखोंच्या संख्येने तो स्वतः सहभागी होत असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले.