बीड जिल्ह्यातील कोणते प्रश्न मार्गी लावले? जिल्ह्यात कॉग्रेस वाढविण्यासाठी काय योगदान?
प्रारंभ न्युज
बीड : जिल्ह्यात अनेक मोठे नेते आहेत, यात केजच्या रजनीताई पाटील आहेत. पुर्वी सुद्धा त्या खासदार होत्या व सध्याही त्या खासदार आहेत. प्रचंड हुशार व अभ्यासू नेत्या म्हणून त्यांची देशात एक ओळख आहे. गांधी घराण्याच्या अत्यंत विश्वासू म्हणून सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे. यामुळेच त्यांना खासदारकी सुद्धा मिळाली आहे. खा.रजनीताई पाटील यांच्या खासदारकीचा व हुशारीचा बीड जिल्ह्याला काय फायदा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासह रजनीताई पाटील यांना पक्षाने अनेक वेळा मोठी जबाबदारी दिलेली आहे, परंतू त्यांनी बीड जिल्ह्यात कॉग्रेस पक्ष वाढविण्यासाठी विशेष असे प्रयत्न आज पर्यंत केलेले दिसत नाही. यामुळे त्यांच्या खासदारकीचा बीड जिल्ह्याला काय फायदा असा साधा प्रश्न बीडकरांना पडत आहे.
खासदार रजनीताई पाटील ह्या गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे त्या गांधी घराण्याच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या ओळखीचा व त्यांच्या पदाचा व हुशारीचा बीड जिल्ह्याला मोठा फायदा होऊ शकतो. परंतू आज पर्यंत त्यांच्या पदाचा फायदा बीडकरांना झालेला नाही. बीड जिल्ह्यात विविध प्रश्न प्रलंबित असून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यातील मजूर कायम ऊसतोडणीचे काम करतात, येथील युवक सुद्धा रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात स्थलांतरीत होऊ लागला आहे, जिल्ह्यात रोजगार उभा करण्यासाठी सर्वच नेत्यांनी विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे. यासह इतर प्रश्न बीडकरांना भेडसावत असताना यासर्व प्रश्नांकडे नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. केंद्रात खा.रजनीताई पाटील यांचे चांगले वजन असून त्यांनी जर ठरवले तर येथील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. परंतू आज पर्यंत तरी खा.रजनीताई पाटील यांनी जिल्ह्यातील प्रश्नांबाबात पुढाकार घेतलेला नाही. मग एवढ्या मोठ्या नेत्या असून त्या नेत्याचा बीड जिल्ह्याला काय फायदा झाला अशा साधा प्रश्न बीडकरांना पडत आहे.