प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रमाण वाढत असून हे लोन आता न्यायालयात सुद्धा गेल्याचे दिसत आहे. आज (ता. 20) धारुर येथील न्यायालयात येथील महिला सहाय्यक सरकारी वकील यांना 1500 रुपयांची लाच घेताना एसीबींने रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सुरेखा लांब (वायबसे) सहायक सरकारी वकील, धारूर असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. लांब यांनी तक्रारदारास निकालाची प्रत काढून देण्यासाठी 1500 रुपयांची मागणी केली. हिच लाच घेताना त्यांना धारूर न्यायालयात रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.