“स्व.विनायकराव मेटे यांच्या अस्थिकलशाचे गावोगावी शोकाकुल वातावरणात अंत्यदर्शन”
स्व.विनायकराव मेटे यांच्या अस्थिकलश यात्रेत जनता झाली भावनीक
बीड प्रतिनिधी : स्व.आ.विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून दुःखवटा व्यक्त केला जात आहे. त्यांच्या जाण्याने बीड जिल्ह्याचे आतोनात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यात स्व.आ.विनायकराव मेटे यांच्या अस्थिकलश याञेस कालपासुन सुरुवात झालेली आहे. यात चार अस्थिकलश रथ असून संपुर्ण बीड जिल्ह्यात चार दिवस गावोगावी जाऊन २२ ऑगस्ट रोजी पैठणला पोहचणार आहेत. २३ ऑगस्टला अस्थिंचे विसर्जन करण्यात येणार आहे.
संपूर्ण बीड जिल्हयात सर्वसामान्य नागरीकांच्या दर्शनासाठी स्व.आ.विनायकरावजी मेटे साहेब यांचा अस्थीकलश यात्रेस काल शुक्रवार दि. 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2022 पर्यंत जिल्हयातील सर्व तालुका, महत्वाची शहरे व गावाच्या ठिकाणी आदरांजली अर्पित करण्यासाठी व दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे. या अस्थीकलश यात्रेची सुरूवात काल शिवसंग्राम भवन नगर रोड, बीड येथुन होऊन यात्रेचे विर्सजन श्री क्षेत्र पैठण जि.औरंगाबाद या ठिकाणी मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी होईल. सदर यात्रेमध्ये अस्थिकलशाचे चार रथ सामील आहेत. स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांची अस्थिकलश यात्रेस काल सुरुवात झाली. स्व.विनायकराव मेटे हे गोरगरीब वंचित उपेक्षितांचे नेते होते त्यांच्या अस्थिंचे सर्वांना दर्शन घेता यावं व श्रद्धांजली अर्पित करता यावी यासाठी ही अस्थिकलश यात्रा बीड जिल्ह्याच्या चार दिशेने रवाना करण्यात आलेली आहे.
कलश क्रमांक 1. या रथयात्रेचा मार्ग बीड – पाटोदा – शिरूर आष्टी हा मार्ग असून स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांची अस्थिकलश यात्रा शिवसंग्राम भवन बीड येथून अंबिका चौक -पांगरी -उमरद फाटा – दगडी शहाजानपूर – पारगाव -सोनगाव -बहादरपूर – साक्षाळपिंप्री – पौंडूळफाटा – नारायणगड – पौंडूळक्रमांक एक – लिंबा -खांबा – खालापुरी – जांब -आर्वी – पाडळी -शिरूर कासार – आनंदगाव – नागरेचीवाडी – तागडगाव -रायमोहा – खोकरमोहा व हिवरसिंगा येथे मुक्कामी पोहचली.आज सकाळी राजुरी नं.मार्गे पुढे मार्गस्थ झाली.
कलश क्रमांक 2 :/बीड – वडवणी – गेवराई मार्ग
ही रथयात्रा जिरेवाडी -पेंडगाव -माळापुरी – कुर्ला – भाटसांगवी -उंब्रद खालसा -खांडेपारगाव फाटा – माळस जवळा -नाळवंडी – जरूड फाटा -शिवनी फाटा – वांगी या गावी मुक्कामी होती.आज सकाळी जरुड,पिंपळनेर मार्गे माजलगाव मुक्कामी साठी पुढे मार्गस्थ झाली.
कलश क्रमांक 3 : नेकनूर – केज – अंबाजोगाई मार्ग
ही अस्थिकलश यात्रा शिवसंग्राम भवन -कोल्हारवाडी – आहेरवडगाव -पाली -कपिलधारवाडी -मांजरसुंबा – उदंड वडगाव -साखरे बोरगाव – वैतागवाडी – तांदळवाडी घाट – अंधापुरीघाट – सावरगावघाट – सात्रा – पोत्रा मुर्शिदपूर – कुंभारी – अंबिलवडगाव – बाळापुर – सावंतवाडी -नेकनुर – कळसंबर – वडगाव कळसंबर – जैताळवाडी फाटा – येळंब माऊली चौक -चाकरवाडी -नांदूरफाटा – वाघेबाबुळगाव – बानेगाव – नांदुरघाट – राजेगाव मुक्कामी होती.आज सकाळी मस्साजोग केज मार्गेअंबाजोगाई मुक्कामी साठी पुढे मार्गस्थ झाली.
कलश क्रमांक 4 : लिंबागणेश मार्ग ,मंझरी -करचुंडी -मोरगाव -वानगाव – रौळसगाव – खडकी घाट – देवी बाबुळगाव – चांदेगाव – जेबा पिंपरी – पालसिंगन – हिंगणी खुर्द -हिंगणी बुद्रुक -चौसाळा -माळेवाडी -रुई गव्हाण -मानेवाडी -पिंपळगाव घाट – वाढवणा या गावी मुक्कामी होती .आज सकाळी बोरखेड लिंबागणेश मार्गे धानोरा गावी मुक्कामासाठी पुढे मार्गस्थ झाली.
” अमर रहे…अमर रहे , मेटे साहेब अमर रहे “…”जब तक सुरज चांद रहेगा , मेटे साहेब नाम रहेगा ” अशा घोषणांनी आसमंत गाजत होता .आपल्या या लोकनेत्याला शोकाकुल वातावरणात सर्व जनता भावनिक होऊन श्रद्धांजली अर्पण करीत आहे.