बीड : शहरातील अनेक महत्वांच्या रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा वावर जास्त झाला आहे. यामुळे शहरातील वाहनधारकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच अनुषंगाने आता पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की, शहरात फिरणारी मोकाट जनावरे ज्यांची असतील ती त्यांनी घेऊन जावीत नसता कायदेशीर कारवाईचा इशारा बीड पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
बीड शहरातील सुभाष रोड, नगर रोड, जालना रोड, बार्शी रोड, मोंढा रोड यासह इतर महत्वांच्या रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही मोकाट जनावरे रस्त्यांच्या मधोमध बसत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आता कारवाईचा इशारा दिला आहे. शहरात फिरणारी मोकाट जनावरे ज्यांची आहेत, त्यांनी घेऊन जावीत नसता या मोकाट जनावरांमुळे कोणाला इजा झाली किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण झाली तर मोकाट जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बीड पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.