बीड प्रतिनिधी : कै अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची बीडची बैठक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष रवि शिंदे यांच्या व कामगार नेते गोरख शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने कै अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील साहेब यांची निवड करून,मराठा समाजातील व्यवसाय करणाऱ्या युवकांना न्याय द्यावा. नरेंद्र पाटील साहेब महामंडळाचे अध्यक्ष झाल्यास अनेक युवकांना व्यवसाय करण्यासाठी व चालू व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज हे उपलब्ध होईल.
या शिंदे व फडणवीस सरकारच्या माध्यमातून कै अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाने सद्य स्थिती मधे ३० कोटी रुपये व्यवसाय धारकांना व्याज परतवा वेळेवर मिळवा या साठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे.
पण पुढील व्यवसाय करणाऱ्या युवकांना कर्ज मिळावे या साठी शासनाने भरघोस असा निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून मराठा समाजातील युवकांना उद्योगास चालना मिळेल. नवीन व्यवसाय धारकांनी सहज रित्या कर्ज उपलब्ध होईल. नरेंद्र पाटील साहेबांना लवकरात लवकर महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करत महामंडळाला निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी कै अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष रवि शिंदे यांनी शासनाकडे प्रामुख्याने ही मागणी केली आहे.
या बैठकीमध्ये पुढील ध्येय धोरणे या विषयावर चर्चा करण्यात आली बीड ठ जिल्ह्यातील मराठा समाजातील व्यवसाय करणारा युवक हा व्यवसायाच्या माध्यमातून त्याला नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज उपलब्ध करून देणार आहोत.असे अण्णासाहेब पाटील फाऊंडेशन चे जिल्हाध्यक्ष रवि शिंदे यांनी युवकांना विश्वास दिला आहे.
यावेळी सचिन पवार,कृष्णा साबळे, शिवरा्ज माने,अंकुश पवार,अर्जुन खोड,वैभव कठाले,अनिल मोरे,बाबू अहेर, ऋषी शेंडगे,संकेत शेळके,अमोल सालगुडे,प्रमोद तळेकर,सिध्देश्वर भोसले, ईश्र्वर पवार,अमोल चव्हाण,सचिन शिंदे,केरुलाकर, पवन बन, अनेक युवक व्यवसाय धारक उपस्थित होते.