दिव्यागांना न्याय देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले – अमरसिंह पंडित
गेवराई प्रतिनिधी : आजवर प्रतिष्ठानने गरजूंना दृष्टी दिली, रुग्णांना मोफत उपचार दिले, कोरोना संकटात मदत केली यावेळी अमरसिंह पंडित यांनी दिव्यांगाना कृत्रिम हात व पाय देऊन पुन्हा उभे केले असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र काळे यांनी केले, तर दिव्यांगाना न्याय देण्यासाठी शिबीराचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेवराईत दिव्यांगाच्या भावनेला फुंकर घालणा-या संवेदनशिल शिबिराचे आयोजन शारदा प्रतिष्ठान आणि साधु वासवानी मिशनच्या वतीने गेवराईत करण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, साधु वासवाणी मिशनचे मिलिंद जाधव, सुशिल ढगे, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, वैद्यकीय अधिक्षक डॉ.महादेव चिंचोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जि.प.सभापती बाबुराव जाधव, जयभवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, उपसभापती शाम मुळे, जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती कुमारराव ढाकणे, आप्पासाहेब गव्हाणे दिपक आतकरे, सरवरखा पठाण
यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे म्हणाले की, गरजू रुग्णांना शारदा प्रतिष्ठानने सातत्याने आधार दिला आहे. समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करुन अमरसिंह पंडित यांनी रुग्णसेवेचे पुण्य कमावले आहे. आपल्या भाषणात बोलताना डॉ.नरेंद्र काळे म्हणाले की, ग्रामिण भागातील रुग्णांना आणि सामान्य माणसांच्या गरजेला पडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अमरसिंह पंडित यांच्याकडे पाहिले जाते. बीड जिल्ह्यातील दिव्यांगाना आधार देण्याचे काम त्यांनी या शिबिरातून केले आहे. साधु वासवाणी मिशनचे सुशिल ढगे यांनी शारदा प्रतिष्ठाने या भागातील गरजूंना कृत्रिम हात व पाय बसवण्याचे शिबिर आयोजित केल्याबद्दल शारदा प्रतिष्ठानचे कार्यवाहक अमरसिंह पंडित यांचे आभार मानले.
शिबीरात दिव्यांगांची तपासणी करून त्यांना कृत्रिम हात व पाय बसविण्यासाठी आवश्यक ती मोजमापे घेण्यात आली. दि. २८ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कृत्रिम अवयवाचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक समजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. कर्करोग निदान शिबीर, नेत्रशस्त्रक्रिया शिबीर, महाआरोग्य रोगनिदान शिबीर आदी शिबीरांच्या माध्यमातून गेवराईसह बीड जिल्ह्यातील रुग्णांना खूप मोठा फायदा झालेला आहे. कोरोनाच्या काळातही माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटरही उभारले गेले होते. या कृत्रिम हात व पाय शिबीरामुळे बीड जिल्ह्यातील दिव्यांगांचा फायदा होणार आहे.
*लोकांचे आश्रु पुसण्याचे काम अमरसिंह भैय्यांनी केले– श्रीमती शेख रुकसार*
================
यावेळी दिव्यांग प्रतिनिधी म्हणून बोलताना शेख रुकसार यांनी भावनिक होऊन शारदा प्रतिष्ठानचे आभार मानले. शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिव्यांगना स्वतः च्या पायावर उभे करण्याचे काम अमरसिंह पंडित करत असून गोरगरिब लोकांचे, रुग्णांचे आश्रु पुसण्याचे कामही अमरसिंह भैय्यानी केले असे म्हणताच गोदावरी सभागृह गहिवरले.
या प्रसंगी बीडसह अजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माधव चाटे यांनी केले तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी आभार मानले. यावेळी दिव्यांगाचे नातेवाईकासह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.