माजी जलसंपदा मंत्र्यांवर कारवाई करा; वेळ पडल्यास कोर्टात जाणार
प्रारंभ वृत्तसेवा
बीड – जयंत पाटील यांनी कोणताही निधी आणि मान्यता न घेता, कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली खोटी निविदा काढून, मराठवाड्याची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. तसेच या जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. यासाठी वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार असल्याचा इशारा आमदार धस यांनी दिला आहे.
आमदार सुरेश धसांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, की निधीची तरतूद नसताना वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना अशा प्रकारची खोटी निविदा काढताचं येत नाही. ती निविदा काढण्यात आलीय. त्यामुळं माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खोटीनाटी याला मान्यता दिली आहे. जलसंपदा मंत्री म्हणून पाटलांनी खोटं नाट काम केले, खोटी निविदा काढली, प्रेशराईज केलं, त्यांनी मराठवाड्याची फसवणूक करण्याचे काम केले. असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी, राष्ट्रवादीचे नेते माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलाय. तर त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात करणार आहे. आणि वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार आहे. असा एक प्रकारचा इशारा धस यांनी दिला आहे.