मॅनेज राजकारणामुळे नगर पालिकेत सत्तापरिवर्तन होईना…!
–मॅनेज राजकारणाला बळी न पडता सर्व एकत्र आले तर सत्तापरिवर्तन निश्चित
बीड : नगर पालिकेत गेल्या 30 ते 35 वर्षापासून क्षीरसागर यांची एकहाती सत्ता आहे. या 35 वर्षात यांनी ठरवले असते तर बीड शहराचा कायापालट यांनी केला असता. परंतु आज पर्यंत बीड शहराच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. आज सुद्धा शहरातील अनेक भागात चांगले रस्ते नाहीत, शहरात जी रस्ते बनवण्यात आली आहेत ती रस्ते दर्जेदार झालेली नसून रस्ते खालीवर असल्यामुळे दुचाकी स्लिप होतात, यासह नागरीकांना आज सुद्धा वेळेवर पाणी देण्यात येत नाही. हे साधे साधे व छोटे छोटे प्रश्न मार्गी लावण्यात आज पर्यंत नगर पालिकेला अपयश आलेले आहे. यामुळे भविष्यात परत तीच वेळ येऊ नये, यासाठी लवकरच होणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणूकीत योग्य पर्याय निवड करुन बीडच्या विकासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच गेल्या 35 वर्षापासून बीड मध्ये सुरु असलेले मॅनेज राजकारण सुद्धा मोडीत काढण्याची गरज आहे.
माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांच्याकडे बीड नगर पालिकेची सत्ता गेल्या 35 वर्षापासून आहे. त्यांनी आज ठामपणे सांगावे की, आज पर्यंत बीड मध्ये असे कोणते मोठे काम केले की, त्यामुळे बीडकरांना मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे शहरातील काहीच भागांचा विकास करण्यात आलेला आहे. आज सुद्धा बीड मध्ये अनेक ठिकाणी चांगले रस्ते सुद्धा नाहीत, अनेक भागात नागरीकांना नळ नाहीत, अनेक भागात घंटा गाडी जात नाही, दोन्हीही तलावात मुबलक पाणी असून सुद्धा बीडकरांना पाण्यासाठी 15 – 15 दिवस वाट पाहावी लागते, अनेक भागातील महत्वांचे रस्ते खराब झालेले आहेत, जे रस्ते झालेले आहेत ती कामे दर्जेदार झालेली नाहीत, शहरात उद्यान उभा करण्यासाठी कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला पण अजून सुद्धा शहरात चांगले व दर्जेदार उद्यान निर्माण केले नाही, सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय उभारण्यात आले नाही, विज बिल न भरल्यामुळे अनेक भागात महिना महिना लाईट नसते याला जबाबदार कोण, झाडांसाठी वसूल केलेला टॅक्स जातो कुठे यासह इतर गैरकामे भागच्या काळात बीड नगर पालिकेत मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. परंतु आज पर्यंत याकडे नागरीकांनी विशेष लक्ष दिले नाही यामुळे ही कामे सुरुच आहेत. येणाऱ्या बीड नगर पालिका निवडणूकीत बीडकरांनी निस्वार्थी चैहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. एकवेळेस इतरांना संधी देऊन पाहा म्हणजे कोण कोणती विकास करुन शकते हे तरी लक्षात येईल…!
सक्षम नेतृत्व निर्माण होईना…!
बीड नगर पालिकेत आज पर्यंत विकासाची गंगा आणण्यात यश आलेले नाही. यामुळे आज पर्यंत येथील सर्व सामान्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. बीड मध्ये सक्षम नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. ज्याला सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असावी, ज्यांला गरिबीची जाण असावी म्हणजे सर्व सामान्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागतील. सध्याचे राजकारण म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा त्याच्या हाती सत्ता हे कुठे तरी थांबले पाहिजे व हे थांबेल पण त्यासाठी जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे.