वाढदिवसानिमित्त हार-फुलांचा व बॅनर्सचा खर्च टाळून लावलेल्या झाडासोबतचा सेल्फी मला पाठवा – धनंजय मुंडे
परळी : 15 जुलै रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा जन्मदिन असून, यादिवशी हार-तुरे, बॅनर्स-फ्लेक्स आदींवर केला जाणार खर्च टाळून त्याऐवजी समर्थक-सहकाऱ्यांनी झाडे लावावीत व त्याचे संवर्धन करावे, तसेच लावलेल्या झाडाचा सेल्फी पाठवावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे यांचा चाहता वर्ग फार मोठा असून, बीड जिल्ह्यात व राज्यभरात त्यांचे असंख्य समर्थक-चाहते आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या या सहकाऱ्यांना यावर्षी अनोखे व अभिनव आवाहन केले आहे.
“सप्रेम नमस्कार,
माझ्या प्रिय सहकारी मित्रांनो, 15 जुलै हा माझा जन्मदिवस आपण सर्व जण दरवर्षी मला भरभरून शुभेच्छा देऊन व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करत असता. हार-तुरे, केक, बॅनर अशा स्वरूपात वाढदिवस साजरा करणे खरंतर मला आवडत नाही.
यावर्षी बीड जिल्ह्यासह सर्वत्र चांगला पाऊस पडत असून, आपल्या भागात वृक्षारोपण होण्याची व वृक्ष संवर्धनाची नितांत गरज आहे. याचाच विचार करून आपण माझ्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, केक-बुके, बॅनर्स-फ्लेक्स, आदी बाबींवरचा खर्च टाळून त्याऐवजी किमान एक झाड लावावे व त्या झाडाचे संवर्धन करण्याचा निर्धार करावा.
झाड लावताना त्यासोबत एक सेल्फी काढून न विसरता मला पाठवायचा बरंका! पुढच्या वर्षी हे झाड मोठे होईल, तेव्हा पुन्हा फोटो पाठवायचा व हे सत्र असेच सुरू राहील; या वाढदिवसाची हीच खरी भेट मला अपेक्षित आहे…!”अ
से धनंजय मुंडे आपल्या आवाहनात म्हणतात.