बीड प्रतिनिधी : शहरातील सुभाष रोडवरील अमृत मंगल कार्यालयात आज दि. 13 जुलै 2022 पासून चतुर्विध संघाचा चातुर्मासास प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने नवकार महामंत्र जप करण्यात येणार असून चतुर्मासाची जय्यत तयारी केली आहे.चातुर्मास महोत्सवास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जैन समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प.पु. प्रणवमुनीजी महाराज साहेब., साध्वी करुणा मूर्ती प.पु. किरणसुधाजी महाराज. साहेब. आदी ठाणा 8 (आठ साध्वी व एक संत) यांचा चतुर्विध संघा चातुर्मास पार पडणार आहे. यावेळी सकाळी 6:30 ते 7:00 प्रार्थना राहील, सजोडा मंगलकारी नवकार महामंत्र जप करण्यात येणार आहे. महिलांनी चुनरी साडी व शुभ्र कपडे परिधान करून 13 जुलै रोजी सकाळी ८ वाजता कार्यक्रमस्थळी येणे आवश्यक आहे. सकाळी पावणे नऊ ते पावणे दहा वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे. त्यानंतर लकी ड्रॉ काढला जाईल. मंगलपाठ नंतर सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत ज्ञानार्जन करता येईल. यावेळी गुरू गणेश मॉलचे उदघाटन करण्यात येणार आहे. उपस्थित रहावे, असे आवाहन चातुर्मास समिती, सकल जैन समाज यांच्या वतीने सुशील सुराणा, आशिष जैन, अतुल मौजकर,अभय छाजेड, मनोज रायसोनी, जितेंद्र लोढा, राहुल बोरा, सुशील खिवंसरा, संतोष बोथरा, रमेश पगारिया, कांतीलाल ओस्तवाल
उमेश संचेती, सचिन धोका, सुशील कोटेचा, महेंद्र दुगड ,(अंमळनेरवाले) संकेत नहार, दिपक आब्बड, तुषार बरलोटा, संजय भंडारी, भूषण बंब, ललित आब्बड, हरीश पडदरिया,सितल ओस्तवाल, महिला मंडळ, बहु मंडळ, अरिहंत युवा, नवकार फाउंडेशन, अरिहंत नेहरु युवा.बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवचनास आवर्जुन उपस्थित रहा
ना घर होगा पास, ना होगी बात;आए थे खाली हाथ, केवल पुण्य देगा साथ।इस सुअवसर का पूरा लाभ उठाएं, गुरु दर्शन, वंदन और जिनवाणी सुन पुण्य कमाएं’.त्यामुळे चातुर्मास प्रवचनास आवर्जुन उपस्थित रहावे व पुण्य मिळवावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
——-