परळी प्रतिनिधी – मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने राज्य समन्वयक अमित घाडगे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ.तानाजी सावंत यांच्या समर्थनात जोरदार घोषनाबाजी करण्यात आली . तर यावेळी समर्थकांनी “ निर्णय तुमचा साथ आमची ” अश्या आशयाचे ब्यनर लावून त्यांच्या निर्णयाचे समर्थन देखील केल्याचे दिसून येत आहे . आ.तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कात्रज भागातील ऑफिसवर काही दिवसांपूर्वी जो हल्ला करण्यात आला होता त्याचा निषेध देखील यावेळी व्यक्त करण्यात आला तर यापुढे असे भ्याड हल्ले खपून घेतले जाणार नाही . तर आम्ही आपल्याला चांगलेच दाखवू असे आव्हान ही यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आले . यावेळी अक्षय सोनवणे , शिवराज जोगदंड , भगवंत गांगारडे , बाजीराव साठे , योगेश सातपुते , प्रवीण सोळंके , प्रदुमन सोनवणे , बाबासाहेब काळे , शरद सोनवणे आदी सह अनेकजण उपस्थित होते .