आता योगेश पर्व ला संधी देऊ नका;या पर्व चे पार्सल राजुरीला पाठवा – ॲड. शेख शफिक भाऊ
बीड प्रतिनिधी- बीड नगरपरिषद निवडणुकीच्या येत्या निवडणुकीसाठी एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी प्रभाग क्रमांक २२ मध्ये घेतलेल्या पहिल्याच कॉर्नर मिटींगला विराट सभेचे स्वरूप आले. या सभेत शफीक भाऊंचे विचार व बोल ऐकून प्रभागातील नागरिकांमध्ये चैतन्य सळसळले. या कॉर्नर मिटींगचे आयोजन तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष शेख एजाज (खन्ना भैय्या) यांच्या अध्यक्षतेखाली व संयोजक जिल्हा सहसचिव अन्वर पाशा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कॉर्नर सभेला उपस्थित प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना शफीक भाऊंनी प्रभाग क्रमांक २२ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना भोगाव्या लागत असलेल्या हाल-अपेष्टांचा उल्लेख करत म्हटले की, बीड नगर परिषदेमध्ये क्षीरसागर घराण्याची सत्ता गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून आहे. या काळात या परिसरात क्षीरसागरांनी अजिबात लक्ष न देता कुठलीही विकास कामे केली नाहीत. चालायला धड रस्ते नाही, कच्चे रस्ते असल्याने नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवत ये-जा करावी लागते. नाल्या नसल्याने परिसरातील सर्व सांडपाणी रस्त्यांवरून वाहते. विजेचे खांब आवश्यक त्या प्रमाणात अजूनही लावण्यात आलेले नाही. एवढेच नाही तर जीवनात अत्यंत आवश्यक असलेले पाणी सुद्धा माजलगाव आणि पाली चे धरण तुडुंब भरलेले असताना सुद्धा या प्रभागात आजही १५ ते २० दिवसाआड नळांना पाणी सोडण्यात येते. क्षीरसागर यांनी या प्रभागाकडे नेहमी दुर्लक्ष केल्याने हा प्रभाग विकासापासून कोसो दूर आहे. अशा अवस्थेत ही हे घराणे तोंड वर करून पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत योगेश पर्व ला संधी द्या म्हणून जनतेसमोर येत आहेत. गेल्या ३० वर्षांपासून भूषण पर्व ला संधी देऊन आपण सर्वांनी बघितलेच आहे. या भूषण पर्व च्याच करणीमुळे काल पडलेल्या अवघ्या एका तासाच्या पावसात बीड शहराला गटार गंगेचे स्वरूप आले होते. या अवस्थेला सर्वस्वी जबाबदार आहे ते भूषण पर्व आणि पुन्हा हे योगेश पर्व ला संधी द्या म्हणत आहेत. आता जनता पूर्वीसारखी राहिलेली नाही. जनतेचे हाल जनतेला माहित आहेत. या हालअपेष्टातून बाहेर निघण्याकरिता योगेश पर्वला संधी न देता या पर्वचे पार्सल राजुरी ला पाठवा. आणि तळागाळातल्या प्रभागात खरा विकास कसा असतो हे दाखविण्याकरिता आगामी बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला संधी द्या. पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या. बहुमताचा आकडा जेव्हा आपल्या मतदानाने पक्षाला मिळेल तेव्हा बघा एआयएमआयएम पक्ष खरा विकास कसा असतो ते दाखवून देईल. शफीक भाऊंच्या या मनोगताला सभेला उपस्थित शेकडो नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
यावेळी शहराध्यक्ष शिवाजी भोसकर, ज्येष्ठ नेते अब्दुस् सलाम सेठ, रिटायर कर्मचारी जिल्हाध्यक्ष शेख वजीर सर, युवा नेते फैय्याज खान, जिल्हा समन्वयक सय्यद सैफअली
(लालु भैय्या), शहर सचिव जानी भाई, रिक्षा संघटना अध्यक्ष नवाब शिकलकर, युवक शहर अध्यक्ष शेख सलमान, युवक शहर सचिव शाहेद कवडगावकर, युवा नेते फसी भाई, सह प्रवक्ता तथा सोशल मीडिया लोकसभा अध्यक्ष शेख बिलाल, बांधकाम संघटना शहराध्यक्ष सय्यद बासेद भाई, युवक शहर उपाध्यक्ष जुबेर पठाण, गेवराई तालुका सचिव लियाकत बेग, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सोहेल शिकलगार, सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष अयान इनामदार, सोशल मीडिया शहराध्यक्ष जैफ सिद्दीकी, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष अबरार बागवान, सोशल मीडिया शहर उपाध्यक्ष आमेर खान, शहर सह सरचिटणीस सय्यद शारेख, युवा नेते शेख मुदस्सिर, रियाज खान, शेख रोहीब व आयोजन सय्यद अय्युब (अमीर साहाब), शेख रशीद, सय्यद युनुस, फेरोज मनियार, आवेज मनियार, उमर भाई, रेहान भाई, सय्यद साद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.