–पंकज कुमावत साहेब तुमच्याच टिम मधील काही जण गैरकामे करु लागली–गेवराई तालुक्यातुन बेसुमार वाळू उपसा
-टेंडर घेणारे नेतेच करु लागले मनमानी
–संबंधित काही अधिकार्यांना मिळू लागला मलिदा
-दिवसभरात एका टिप्परच्या चार खेपा
–जास्त खेपा करण्याच्या नादात टिप्पर जिल्ह्यात सुसाट
-अनेक टिप्परला नंबरच नाहीत; नंबर प्लेटवर काहींना काही लावलेलेच असतेप्रारंभ वृत्तसेवाबीड : जिल्ह्यातील काही ठिकाणी वाळूचे लिलाव करण्यात आलेले आहेत. परंतु लिलाव करताना काही नियम ठरवण्यात आलेले आहेत. पण सध्या संबंधित यंत्रणेकडून हे सर्व नियम धाब्यावर बसून वाळूचा बेसुमार उपसा सुरु करण्यात आलेला आहेत. विशेष म्हणजे यात वाळूचा ठेका घेणारे पुढारी आहेत. याच पुढाऱ्यांची चलती असल्यामुळे ते म्हणतील तसे सध्या सुरु आहे. तसेच महसूल व पोलीस विभागातील काही अधिकारी,कर्मचारी यांचेच यात टिप्पर चलत आहेत. यासह ठराविक रक्कम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठरवून देण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे संबंधित यंत्रणा यासर्व बाबींकडे दुर्लक्ष करत आहे. गेवराई व बीड तालुक्यातील काही गावातुन सध्या बेसुमार वाळू उपसा करण्यात येत आहे. जास्त खेपा करण्याच्या नादात जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर टिप्पर सुसाट पळत असल्याचे दिसत आहे. तरी जिल्ह्यात चाललेला हा मनमानी कारभार रोखण्याची मागणी होत आहे.गेवराई तालुक्यातुन गोदावरी नदी जात असल्यामुळे गेवराईकरांसाठी ही बाब चांगली आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून वाळू माफियांनी सुरु केलेल्या अति वाळू उपसामुळे येथील नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज ही नदी गेवराईकरांसाठी वरदान की शाप अशी म्हण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गैरकामे केली जात आहेत. त्यात येथील बेसुमार उपसा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. अति उपसा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या गेवराई तालुका, माजलगाव तालुका व इतर ठिकाणी काही वाळूचे लिलाव करण्यात आलेले आहेत. परंतु हे लिलाव करताना शासनाने काही नियम ठरवून दिलेले आहेत. परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे दिसत आहे. ज्यांनी वाळूचे टेंडर घेतलेले आहेत. त्यात पुढारी असून ते पुढारी जसे म्हणतील तसे सध्या होताना दिसत आहे. एकाच पावतीवर तीन तीन खेपा मारण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. यामुळे शासनाचे मोठे नुकसान करण्याचे पाप संबंधित यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचारी करताना दिसत आहेत. यामुळे हा सर्व प्रकार रोखण्याची मागणी आता होऊ लागली आहे.संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचेच टिप्परजिल्ह्यात वाळू माफियांनी त्यांची मनमानी केल्याच्या अनेक घटना वारंवार दिसत आहेत. यावर अनेक वेळा विशेष नियम लावून ही माफियागिरी संपवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु आज पर्यंत सर्वांनाच अपयश आले आहे. सध्या जिल्ह्यात जी वाळूची वाहतुक होत आहे. त्यात नेते, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे टिप्पर आहेत. यामुळे ही माफियागिरी बंद कशी होणार. पहिले यंत्रणेतील दोषींवर कठोर कारवाई करावी लागणार आहे. नंतर नेते व इतर मंडळी परंतु असे होईल असे सध्याच्या वातावरणावरुन तरी दिसत नाही. सध्या नेते, संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळून सर्व गैरकारभार करत आहेत. यामुळे हा सर्व प्रकार रोखण्याची मागणी होत आहे.कुमावत साहेब तुमच्या नावाखाली गैरकारभार सुरुय…
आयपीएस अधिकारी कशा असावा यांचे उत्तम उदाहरण म्हणजे पंकज कुमावत. कुमावत यांनी जिल्ह्यात आल्यानंतर अनेकांना खाकी काय असते हे दाखवून देण्याचे काम केलेले आहे. यामुळेच बीड जिल्ह्याला पंकज कुमावत सारखा अधिकारी देण्याची मागणी होत आहे. परंतु सध्या पंकज कुमावत यांच्या टिम मधील काही जण पंकज कुमावत यांच्या नावाचा गैरवापर करुन गैरकारभार करत आहेत. यामुळे पंकज कुमावत यांचे नाव बदनाम होत आहे. साहेब आपण जिल्ह्यात चांगले काम करत आहात परंतु तुमचे काही जण तुमचे नाव खराब करत आहेत. यामुळे वेळीच हे लोक बदला म्हणजे तुम्हाला अजून चांगले काम करता येईल.