20 तारखेपासून तीन प्रभागांमध्ये नियमित पाणी पुरवठा – आ. संदिप क्षीरसागर
प्रारंभ वृत्तसेवा
बीड प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षापासून बीड शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही. पाणी असूनही पाण्यावाचून बीडकरांचे हाल सुरू आहेत. शहराला नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी वेळोवेळी पाठपुरावा केला व मन:पुर्वक प्रयत्न केले. यातूनच 20 एप्रिलपासून शहरातील दोन प्रभागांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू झाला असून उर्वरित प्रभागांमध्ये लवकरात लवकर सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शनिवारी (ता. 30) आ.संदीप क्षीरसागर यांनी यासाठी सर्व आवश्यक बाबींची पाहणी केली. आई जाण्याचे दु:ख असून सुद्धा आ.संदिप क्षीसागर यांनी नागरीकांच्या सेवेत काम करण्यास सुरुवात केली आहे.
बीड शहरातील प्रभाग क्र.18,19 व 20 मध्ये गेल्या 20 तारखेपासून नियमितरित्या पाणी येत आहे. बीड शहरातील अनियमित पाण्याचा प्रश्न हा शहरवासियांसाठी जिव्हाळ्याचा ठरलेला आहे. पाणी साठा उपलब्ध असूनही यंत्रणेअभावी शहरवासियांना पाणी मिळत नाही याकरिता आ.संदीप क्षीरसागर यांनी कंबर कसली होती व शर्थीचे प्रयत्न केले होते. या माध्यमातूनच वेळोवेळी पाठपुरावा करून शहरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत: प्रत्यक्षरित्या कामाला लागले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र असून शहरातील तीन प्रभागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. उर्वरित संपुर्ण शहराचा पाणी पुरवठाही लवकरच सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची आज शनिवार दि.30 एप्रिल रोजी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधितांना आवश्यक त्या सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. यातूनच शहराला लवकरात लवकर नियमितपणे पाणी मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी पाहणी करतांना आ.संदीप क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम व पाणी पुरवठ्याचे अधिकारी उपस्थित होते.
आईचे दु:ख बाजूला ठेवून आमदार लागले कामाला
आमदार संदिप क्षीसागर यांच्या मातोश्री रेखाताई क्षीरसागर यांचे दु:खद निधन झाले असून हे दु:ख बाजूला ठेवून आ.संदिप क्षीरसागर कामाला लागले आहेत. त्यांनी आज बीड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी आज पाणी पुरवठा कामाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, लवकरच बीड शहरातील पाणी प्रश्न मार्गी लागेल.