मराठा आरक्षण व मराठा मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा नोंद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड: अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून आज बीड येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात युवा नेते स्वप्निल गलधर यांच्या फिर्यादीवरुन सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षणाविषयी तसेच समाजबांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याचे निदर्शनास आले. तसेच दिलीप पाटील यांच्या फेसबुक पेजवरील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ॲड. सदावर्ते यांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे निदर्शनास आले. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या धार्मिक श्रध्दांचा अवमान करुन भीती पसरविल्याचा ठपका ठेऊन कलम १५३ (ए), २९५ (ए), ५०५ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. भाजपचे बीड तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.
.