प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या आठ वर्षापासून बंद असलेला बीड तालुक्यातील गजानन सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर सुरु करण्यासाठी बँकेने हलचाली सुरु केल्या आहेत. 2014 पासून सदरील कारखाना बंद आवस्थेत आहे. यामुळे येथील उस उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे संबंधित नेत्यांनी म्हणावे असे लक्ष आज पर्यंत दिलेले नव्हते. कर्जाचा आकडा वाढत असल्यामुळे बँकेनेच कारखाना भाडेतत्वावर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लवकरच गजानन सहकारी साखर कारखाना सुरु होण्याचे चिन्ह दिसत आहेत.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात येते. येथील नदीपात्राच्या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत असल्यामुळे ते ते शेतकरी ऊसाची लागवड जास्त प्रमाणात करतात. पाणी उपलब्ध असल्यामुळे या शेतकऱ्यांचे उत्पादन सुद्धा चांगले येते, परंतु कारखान्यांकडून वेळेवर ऊस नेण्यात येत नाही यासह इतर समस्यांमुळे येथील शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकतर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या कमी त्यात अनेक कारखाने बंद असतात जी कारखाने सुरु असतात ती कारखाने शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी आपल्या समोर आहेत. 2014 पासून बीड तालुक्यातील गजानन सहकारी साखर कारखाना बंद आवस्थेत आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षापासून विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. दिवाळखोरीत गेलेला गजानन सहकारी साखर कारखान आता सुरु होण्याचे चिन्हे दिसत आहेत. कारखान्याकडे बँकेचे 90 कोटी कर्ज असून कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बँकेने कारखाना भाडेतत्वावर सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.
कारखाना सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा फायदा…!
बीड तालुक्यासह जिल्ह्यातील नागरीकांना सोयीचा ठरणारा गजानन सहकारी साखर कारखाना सुरु झाल्यानंतर मोठा फायदा होणार आहे. अनेक वेळा कारखाना सुरु करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे परंतु आज पर्यंत कारखाना सुरु झालेला नाही. पण आता बँकेनेच कारखाना भाडेतत्वावर सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे येणाऱ्या वर्षात कारखाना सुरु हाईल व त्यांचा फायदा येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल असे चित्र निर्माण झाले आहे.