बीड : 26 जानेवारी हा दिवस बीड जिल्ह्यासाठी मात्र आंदोलन वार ठरला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी 12 धरणे आंदोलन करण्यात आली. यावेळी येथील एक आंदोलन करणारी महिला चक्क झाडावर चढल्याने प्रशासनाची मात्र तारांबल उडाली होती. आंदोलन कर्त्या महिलेची समजूत काढण्यासाठी आमदार संदिप क्षीरसागर यांनाच झाडावर चढावे लागले. महिलेची समजूत काढल्यानंतर महिला झाडावरून खाली उतरली. आमदारांच्या या कामामुळे मात्र त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रजासत्ताक दिनी बीड नगर परिषदेतील कंत्राटी महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या त्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनास निवेदने देत आहेत. परंतु आज पर्यंत त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे येथील उपोषण करणारी महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढली. यानंतर महिलेची समजूत काढण्यासाठी स्वत: बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनाच झाडावर चढावे लागले. आमदार संदिप क्षीरसागर यांनी महिलेची समजूत काढल्यानंतर सदरील महिला खाली उतरली. आमदार स्वत:झाडावर चढल्यामुळे सर्वसामान्यांचा आमदार कसा असो हे दिसले.