प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शहरातील पंचशील नगर येथील रस्त्याची समस्या, निवेदन देऊनही मार्गी लागत नसल्यामुळे बुधवारी (ता. 26) पोलीस मुख्यालय येथील झेंडावंदनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर एकाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा पर्यंत केला. परंतु वेळीच पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी त्या व्यक्तीकडे धाव घेतली व त्या व्यक्तीच्या हातातील सर्व साहित्य जप्त करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले यामुळे मोठा अनर्थ टळला. याठिकाणी थोडा जरी विलंब झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. परंतु पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके व त्यांच्या टिममुळे आज एकजणाचा जीव वाचला. या कामगिरीमुळे पोलीस विभागाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बीड शहरातील पंचशील नगर परिसरातील रस्ता दर्जेदार न केल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील रस्त्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला लेखी निवेदन देऊन सुद्धा येथील रस्त्याचा प्रश्न मार्ग लागत नसल्यामुळे पंचशील नगर भागातील विनोद शेळके यांनी बुधवारी शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात झेंडावंदनस्थळी जाऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर आत्मदहन करण्याचा पर्यंत केला होता, परंतु या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी तात्काळ शेळकेकडे धाव घेत, शेळकेच्या हातातील सर्व साहित्य जप्त केले. वेळीत सावधगिरी दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला यामुळे पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.