–अधिकाऱ्यांच्या मदतीने येथील काही पुढाऱ्यांच्या घशात देवस्थानच्या जमिनी जातायेत
–दोषी अधिकाऱ्यांना जेल मध्ये घालण्याची गरजप्रारंभ वृत्तसेवाबीड : बीड जिल्ह्यात देवस्थानच्या जमिनी लुटण्याचा धंदाच सुरु झाल्याचे दिसत आहे. येथील हजारो एकर जमिनी येथील काही भ्रष्ट नेत्यांनी व पैसावाल्यांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने लाटल्या आहेत. यात नामलगाव देवस्थानची 26 एकर जमिन सुद्धा हडपण्याच्या तयारी माफिया टोळी होती, परंतु गावकरी सर्तक असल्यामुळे हा डाव हाणून पाडला गेल्या परंतु, अजून सुद्धा या प्रकरणात संबंधित माफियांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले नाही. यामुळे नामलगाव देवस्थान प्रकरणात जिल्हा प्रशासनाची भुमिका संशयास्पद दिसून येत आहे. यामुळे या प्रकरणात आता वरिष्ठांनी लक्ष देऊन या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
नामलगाव देवस्थानची 26 एकर जमीन हडप करण्यात आली होती. परंतु गावकऱ्यांनी सर्तक होऊन हा सर्व डाव हाणून पाडला. नामलगाव सज्जाचे तलाठी आणि मंडळअधिकारी यांनी भुमाफियांच्या नावे ओढलेला फेर रद्द करण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी 21 जुनलाच दिले होते. परंतु अजून पर्यंत या प्रकरणात दोषींवर कारवाईच झालेली नाही. आता या प्रकरणी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर यांनी विशेष लक्ष देऊन यात जे कुणी असतील त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची गरज आहे. एखादा चोर चोरी करुन परत ती वस्ती वापस ठेवत असेल तर तो व्यक्ती चोर नाही का? मग असेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही. कारवाईस विलंब होत असल्यामुळे जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे जिल्ह्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आता जनतेनेच आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.
नेमके झाले असे,
बीड तालुक्यातील नामलगाव येथील गणपती देवस्थानच्या मालकीची घोसापुरी शिवारात 26 एकर जमीन आहे. या जमिनीवरील चक्क देवस्थानचे नाव कमी करुन, भाऊसाहेब हनुमान सावंत, लक्ष्मीकांत अशोक नेहरकर, अविनाश लकुळ नवले यांचे नावे लावण्याचे आदेश उपजिल्हाधिकारी (भु-सुधार) यांनी सहा मार्च 2018 ला तलाठी यांना दिले होते. या आदेशानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 22 मे 2021 ला नामलगाव देवस्थानचे नाव कमी करुन वरील तीन लोकांची नावे लावली होती. हा सर्व प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आवाज उठवत हा सर्व प्रकार हाणून पाडला. सध्या ही 26 एकर जमीन परत देवस्थानच्या नावावर असली तरी, देवाच्या जमिनीची चोरी करणारे मात्र अजूनही मोकाटच असल्यामुळे या प्रकरणातील अधिकारी नेमके काय करत आहेत, अजून त्यांनी यातील दोषींवर कारवाई का केली नाही? यात अधिकारीच दोषी आहेत का? यासह इतर प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत.