येळकोट येळकोट जय मल्हार मालीका आणि सुप्रसिध्द हिंदी चित्रपट तानाजी फेम सिने अभिनेता देवदत्त् नागे यांची प्रमुख उपस्थिती राहणार
बीड : दर वर्षी मराठवाडा लोकविकासमंच, मुंबई, कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाण, बीड व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यामाने व्यसनमुक्ती अभियान बीड येथे राबवले जाते या अभियाना अंतर्गत या वर्षी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धे साठी येळकोट येळकोट जय मल्हार मालीकेत खंडेरायाची भुमिका निभवनारे तसेच सुप्रसिध्द हिंदी चित्रपट तानाजी मधील महत्वपूर्ण भुमिका निभावणारे अभिनेते देवदत्त् नागे हे बीड येथे येणार आहेत. अशी माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
26 डिसेंबर रोजी बीड शहरात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील धावपटू सहभागी होणार आहेत. कोरोना व लॉकडाऊन नंतर दोन वर्षांत पहिल्यांदाच आरोग्यासाठी बीडकर रस्त्यावर धावणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बीड शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शिवसंग्रामचे आ. विनायकराव मेटे यांच्या वतीने 26 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुप्रसिध्द अभिनेते देवदत्त् नागे उपस्थित राहणार असल्याने या स्पर्धे विषयी नक्कीच उत्सुकता वाढेल आणि राज्यातील जास्तीत जास्त नागरीक या स्पर्धेत सहभागी होतील अशी अशा आयोजन समितीने व्यक्त केली आहे.