बीड नगर पालिकेवर 300 कोटीचे कर्ज – माजी नगरसेवक खालेद पेंटर
बीड : गेल्या काही वर्षापासून बीड नगर पालिकेचे कामकाज निराशा जनक असल्याचे, नगर पालिकेच्या कामकाजावरुन दिसत आहेत. यासह नगर पालिकेतील अर्थिक नियोजन योग्य नसल्याने नगर पालिकेवर 300 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती जेष्ठ माजी नगरसेवक खालेद पेंटर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध विषयांच्या अनुषंगाने आज (ता. 05) दुपारी शिवसंग्राम भवन येथे शिवसंग्रामच्या वतिने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक खालेद पेंटर यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी बीड नगर पालिका तोट्यात असल्याचे सुद्धा सांगितले. सध्या बीड नगर पालिकेवर 300 कोटी पेक्षा जास्त कर्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यात महावितरणचे 30 कोटीची थकबाकी आहे.