–अज्ञातांकडून शहरात ठिक-ठिकाणी समस्यांबाबत प्रकाशीत झालेल्या बातम्यांची बॅनरबाजी
–शहरातील समस्यांमुळे बीड नगर पालिकेच्या विरोधात नागरीकांमध्ये रोष
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : चिखल बीड होतचं आता कचरा बीड झालयं, बीड करांनो बघा अन शांत बसा! हे चित्र कधी बदलणार या नावांचे फलक शहरात ठिक-ठिकाणी लागले आहेत. या फलकावर शहरातील समस्यांची दखल घेणाऱ्या दैनिकांच्या प्रकाशीत झालेल्या बातम्या घेण्यात आल्या आहेत. शहरात असे बॅनर लागण्याची ही पहिलीच वेळ असून नगर पालिकेचा कारभार यातून चव्हाटयावर आणण्याचे काम झाल्याचे दिसते. शहरात लागलेले बँनर कुणी लावलेले आहेत हे मात्र या बँनरवर कुठेच दिसत नाही. परंतु ज्यांनी कुणी हे बँनर लावलेले आहेत. त्यांनी मात्र सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त केल्याचे या बँनरवरुन दिसत आहे. नगर पालिकेने आता तरी शहरातील समस्या मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. जर शहरातील समस्या तात्काळ मार्गी लागल्या नाही तर येणाऱ्या निवडणूकीत येथील जनता नगर पालिकेला हिस्का दाखवल्या शिवाय राहणार नाही असेच चित्र काहीसे निर्माण झाले आहे.
बीड शहरात गेल्या 35 ते 40 वर्षापासून बीड नगर पालिकेवर एक हाती सत्ता असून सुद्धा बीड शहरातील मुलभूत प्रश्नच आज पर्यंत मार्गी लागलेले नाहीत. नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर हे गेल्या 40 वर्षापासून नगरपालिकेवर आहेत. परंतु त्यांना शहरातील मुलभूत प्रश्नांचे काहीच देणं-घेणे नसल्याचे त्यांच्या कामकाजावरुन दिसून येत आहे. बीड शहरातील अनेक भागात गेल्या काही वर्षापासून विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. यात अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे, नागरीकांना वेळेवर पाणी मिळत नाही, वेळेवर कचरा उचण्यात येत नाही, अनेक भागात नियमित घंटा गाडी येत नाही, वेळेवर नाल्या साफ करण्यात येत नाहीत यासह इतर समस्या बीड शहरातील अनेक भागात निर्माण झालेल्या असताना सुद्धा यासर्व प्रश्नांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार या संदर्भात नागरीकांनी तक्रारी करुन सुद्धा येथील हे प्रश्न मार्गी लागत नसल्याचे दिसत आहे. यामुळे बीड शहरातील अज्ञातांकडून ठिक-ठिकाणी बीड शहरात निर्माण झालेल्या समस्यांच्या प्रकाशीत झालेल्या बातम्यांचे कात्रणचे बँनर लावण्यात आलेले आहे. शहरात लावण्यात आलेल्या बँनरमुळे बीड नगर पालिकेचे कामकाज चव्हाट्यावर आले आहे. ह्या बँनरबाजीमुळे बीड शहरातील नागरीकांच्या भावनाच व्यक्त झाल्याचे बोलले जात आहे. आता तरी बीड नगर पालिकेने शहरातील प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात अशी चर्चा आहे. बँनरबाजीमुळे तरी बीड नगर पालिकेला जाग येणार का? व बीड शहरातील मुलभूत प्रश्न मार्गी लागणार का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे.