‘महंत श्रीरंग महाराज डोंगरे यांचे अमृततुल्य कीर्तन संपन्न’
‘हजारो भाविकांची उपस्थिती’
‘एक महिनाभर हर्षोल्हासात काकडा भजन’
‘बीड जवळ मोठे भक्ती केंद्र म्हणून नावारूपाला’
*बीड*- बीड जवळील श्री क्षेत्र गौतम ऋषी संस्थान पालवण येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘काकडा भजन आरतीची’ सांगता आज मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाली.त्यानिमित्त संस्थानाचे महंत ह.भ.प.प.पू.गु.श्रीरंग महाराज डोंगरे यांची अमृततुल्य कीर्तन सेवा झाली.गेल्या महिन्याभरापासून महंत श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व समाज प्रबोधनकार युवा कीर्तनकार अक्षय महाराज पिंगळे, श्री क्षेत्र नारायण गडाचे विश्वस्त भीमराव भाऊ मस्के, उपसरपंच कांता नाना मस्के, यांच्या उपस्थितीत व पंचक्रोशीतील शेकडो टाळकरी व शेकडो भाविकांनी या काकडा भजन आरतीमध्ये सहभाग घेतला होता.पालवण, वरवटी, पाली,पिंपळवाडी, आहेर धानोरा, गवळवाडी,धुमाळ वाडी, आनंदवाडी तसेच बीडमधील संत नामदेव नगर, पंचमुखी हनुमान मंदिर, उत्तम नगर संस्कृती विहार,भाविक दररोज सहभागी होत असत.काकडा भजन सम्राट सुभाष महाराज तौर, गायनाचार्य प्रल्हाद महाराज समगे,गायनाचार्य बंडू महाराज जटाळ, तुकाराम महाराज भोसले, बाबासाहेब महाराज देशमुख, विलास महाराज घोलप, श्रावण बप्पा मस्के, दिनकर महाराज मस्के, सखाराम पवार,अंकुश महाराज मस्के, अंकुश महाराज साबळे, मधुकर महाराज घोलप, नवनाथ महाराज घोलप,अरुण महाराज मस्के, सखाराम शेळके, जयराम सातपुते,मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज भोसले,सुरेश महाराज पांचाळ,ईश्वर महाराज ढवळे, बाल टाळकर्यांसह शंभर टाळकरी उपस्थित होते.
तसेच आजच्या कीर्तनासाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.जयश्रीताई मस्के,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,पार्वतीचे माजी सरपंच राजेंद्र भीमराव मस्के,रामजी पवार, अशोक उगले सर, गणेश डोंगरे सर,भैरूअण्णा घोलप,यांच्या भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कदाचित बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र गौतम ऋषी संस्थान पालवन ता.जि.बीड येथेच एवढ्या मोठ्या उत्साहाने व सहभागाने काकडा आरती भजन संपन्न होत असेल.आज काकडा भजन आरतीची सांगता झाली.महाराजांनी यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ‘ आता कोठे धावे मन | तुझे चरण देखलिया || भाग गेला शीन गेला | अवघा झाला आनंद || या अभंगावर अमृततुल्य चिंतनीय सेवा केली.भगवंत प्राप्तीसाठी साधकांची तळमळीचे अतिशय हृदय स्पर्शी चिंतन महाराजांनी केले.एकदा भगवंत प्राप्त झाला की मनाची धावपळ थांबते,अशा दोन्हीही अवस्थेचे व स्थितीचे मन हेलावून टाकणारे विचार कीर्तनातून महाराजांनी मांडले.आज हजारो भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था पालवण येथील युवा नेतृत्व श्री संदीप भास्करराव मस्के पाटील यांनी केली होती तर गौतम ऋषी संस्थानावरील तरुण भाविकांनी सर्व भक्तांच्या भोजनाची व पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती.