–जिल्ह्यात सध्या माफियाराज, पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष, राजकिय नेत्यांचा हस्तक्षेप वाढला
प्रारंभ वृत्तसेवा
–प्रारंभच्या दणक्याने अवैद्य गुटखा प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुमची शिवसेना ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारी शिवसेना आहेत. परंतु सध्या तुमच्या पक्षात अनेक भ्रष्ट कार्यकर्ते दाखल झाले असून ते सत्तेचा गैरवापर करत आहे. बीड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख चक्क गुटखा विक्रीमध्ये सक्रिये असल्याचे बुधवारी (ता. 17) केज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातुन दिसले. हे जर असेल सुरु राहिले तर येणाऱ्या काळात तुमच्या पक्षाची किंमत सर्वसामान्यांमध्ये कमी होईल. यामुळे वेळीच सावध व्हा व तुमच्या पक्षात असलेल्या भ्रष्ट कार्यकर्त्यांना तुमच्या भाषात चांगले सल्ले द्याच, म्हणजे यापुढे तरी ते कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करतील. सध्या बीड जिल्ह्यात माफियाराज सुरु झाले असून याकडे बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आर.राजा.स्वामी हे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आयपीएस अधिकारी पंकज कुमावत वर्दीची हवा माफियांना दाखवत आहेत. पंकज कुमावत यांनी केलेली कारवाई खरोखरच धाडसी कारवाई आहे. अनेक मोठ्या नेत्यांकडून त्यांना दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी त्यांचे कार्य पार पाडले. खरोखरच बीड जिल्ह्याला पंकज कुमावत सारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे…
केज विभागाचे अधिकारी म्हणून आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी येथील गुटखा माफियांना दणके देणे सुरु केले आहे. याच अनुषंगाने त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी त्यांच्या टिम समवेत बीड तालुक्यातील इमामपुर परिसरातील एका ठिकाणी मोठा गुटखा पडकला, यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलावर एक फोन आला, यानंतर पोलीसांनी त्या व्यक्तीला फोन स्पीकरवर टाकण्याचे सांगितले. यांनतर पुढील व्यक्ती म्हणला की, मी कुंडलिक खांडे बोलतोय कोणते आँफीसर आहेत ते त्यांना सांगा हा गुटखा कुंडलिक खांडेचा आहे, येथून जा म्हणा. यानंतर कुंडलिक खांडे यांनी फोन ठेवला. यांनतर काही वेळेने याठिकाणी एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी क्रमांक (एम.एच.23.एन.1001) आली. परंतु यावेळी याठिकाणी पोलीसांचा ताफा पाहून येथून कुंडलिक खांडे यांनी पळ काढला. यानंतर पोलीसांनी सविस्तर माहिती घेत बीड शहरातील दोन ठिकाणी छापे मारले यात सुद्धा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले. वर्दी काय असते हे आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांनी दाखवून दिले. कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्ताधारी पक्षातील जिल्हा प्रमुखावर त्यांनी अखेर बुधवारी (ता. 17) त्यांनी अवैद्य गुटखा प्रकरणी गुन्हा नोंद केला. खरोखरच पंकज कुमावत सारखे सर्व अधिकारी वर्दीची लाज राखू शकले तर येथील दोन नंबरचे धंदे इतिहास जमा होतील, परंतु काही अधिकारी सोडले इतर अधिकारी फक्त नावालाच उरले आहेत. बीड जिल्ह्यातील माफियाराज संपवण्यासाठी येथील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बीडच्या जिल्हाप्रमुखाने कधी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा काढला का?
बीड जिल्ह्यात एकेकाळी शिवसेनेचे भगवे वादळ होते. माजी राज्य मंत्री सुरेश नवले, माजी आमदार सुनिल धांडे यांच्यावेळी शिवसेना सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आवाज उठवत होती. परंतु सध्याचे जिल्हाप्रमुख स्वता:चे खिसे भरण्यातच मग्न आहेत. यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे काहीच देणं घेणे राहिल्याचे दिसत नाही. बीडचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी कधी जिल्ह्यातील सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवल्याचे दिसते का? मग ते नेमके कशासाठी जिल्हा प्रमुख झाले आहेत, याससह इतर प्रश्न सध्या बीड जिल्ह्यात उपस्थित होत आहेत.