बीड प्रतिनिधी
गेल्या दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप चालू असून राज्यात एकही असते या दहा दिवसात डेपोच्या बाहेर पडलेली नाही विविध संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांना एसटीच्या कष्टकऱ्यांना पाठिंबा देत आपापली पत्र दिले पण सगळ्यांपेक्षा वेगळे पण हे बीड जिल्हा व्यापारी महासंघाने जपलेले आहे बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी तसेच तालुका अध्यक्ष विनोद ललवाणी शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांचे व्यापारी महासंघाचे कौतुक या अभिनव उपक्रमाबद्दल होत आहे संतोष शेठ सोहनी सदैव सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्ती आहेत सार्वजनिक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा आग्रही सहभाग असतो एसटी कर्मचार्यांच्या संपाचा जिल्हा व्यापारी संघाच्या वतीने पाठिंबा देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली नाही तर या उपोषण करते लोकांना भोजनाची व्यवस्था करून एक अनोखी बांधिलकी जपली आहे
बीड डेपो आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या सभा मंडपासमोर भोजनाचा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम जिल्हा व्यापारी संघाने आयोजित केला या कार्यक्रमाला एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे