अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व ग्रामीण पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई
अंबाजोगाई प्रतिनिधीता लुक्यातील मौजे चिचखंडी येथील तुरीच्या शेतात तब्बल २७ किलो पेक्षा जास्त गांजा पोलिसांनी छापा टाकून पकडला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व ग्रामीण पोलीस ठाणे अंबाजोगाई यांच्या पथकाने बुधवारीी (ता. १०) सायकाळी केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अंबाजोगाई मौजे चिचखंडी येथील कारभारी आबा गडदे याचे शेतात विनापरवाना बेकयादेशीर रित्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना व संगोपन करत आहेत. अशी माहिती गुप्त खबऱ्यामार्फत अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना समजली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी आपल्या पथकातील एपीआय रवींद्र शिंदे,तानाजी तागड.पो. ह.दौंड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे,सपोनि सावंत मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला.
मौजे चिचखंडी येथील सदरील ठिकाणी छापा टाकला असता तुरीच्या शेतामध्ये विनापरवाना बेकादेशीर तब्बल 1.11,200/-रु किंतीचे 25 गांजा सदृश झाडाची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना करताना मिळुन आला.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात केशव मनोहर खाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि सावंत करत आहेत.