आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला मोठे यश
जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे आ.संदीप भैय्यांनी यांनी मानले आभार
आ.संदीप भैय्यांनी करून दाखवलं,बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील बंधारा कम पुलास आणली मंजुरी
बीड(प्रतिनिधी):- बीड शहराला वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अधिकचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी बिंदुसरा नदीवर निम्नस्तर पातळी बंधारा करण्याच्या कामाला आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून विशेष बाब म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली आहे. बीड शहरासाठी अतिशय सकारात्मक निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घेण्यात आल्याने मंत्री जयंत पाटील आणि सरकारचे आ.संदीप क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत. गेला अनेक वर्षांपासून कोणालाच जे करता आले नाही ते काम आ.संदीप भैय्या यांनी करून दाखवल्याने त्यांचा प्रयत्नला मोठे यश आले असून आ. संदीप भैय्यांचे आभार शहरातील जनता मानत आहे.
बीड शहरातील बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल करण्यात यावा अशी मागणी पेठ बीडसह शहरातील नागरिक यांच्या कडून करण्यात येत होती,मागील अनेक दिवसांपासून आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सदर प्रश्न हाती घेऊन पाठपुरावा सुरू केला. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करत सदर प्रस्तावाची पूर्तता केली. जल संपदा विभागा अंतर्गत हा प्रस्ताव बीड परळी औरंगाबाद आणी मंत्रालय येथील कार्यालयात जात असताना आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केला. दि.10.11.2021 रोजी महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागाच्या उप सचिव जया पोतदार यांनी बिंदूदुसरा नदीवर शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी निम पातळी बंधाऱ्या साठी 0.35 दलघमी पाणी विशेष बाब म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे असे कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना कळवले आहे. सदर कामास
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी या कामाला मंजुरी दिली याबद्दल सर्व बीडवासीयांच्या वतीने त्यांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मनापासून आभार मानले आहेत.
अन जयंत पाटील यांनी भरवला आ.संदिप क्षीरसागर यांना पेढा
बिंदुसरा नदीवरील निम्नस्तरीय पातळी बंधाऱ्याच्या कामास मंजुरी दिल्याबद्दल जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांना पेढे देऊन बीड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यासाठी गेलो असता ना.जयंतराव पाटील यांनी या कामाच्या मंजुरीसाठी आ. संदिप क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करत पेढा भरवला व बीड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रलंबित काम तातडीने मंजूर करणार असल्याचे सांगितले.
दोन तासात मंजूरी आदेश दिल्याबद्दल जयंत पाटील यांचे आभार मानले.