बीड मतदार संघातील बीड आणि शिरूर कासार तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्यापावसामुळे अनेक महसूली मंडळातील शेतातील पीके पुर्णपणे वाया गेली. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागरांनी बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व शासनाकडे मागणी केली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्याबद्दलही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचेही आभार मानले आहेत. दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली पाहिजे. यासाठी तहसीलची यंत्रणा कामाला लावून आ.संदिप भैय्या क्षीरसागर शेतकर्यांना मदत मिळून देण्यासाठी प्रयत्नशिल आहे.
मांजरसुंबा महसूल मंडळाला नुकसान भरपाई द्या
मांजरसुंबा महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतकर्यांच्या पीके पुर्णपणे वाया गेली, याचे फोटो, पंचनामे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. या पावसामुळे या मंडळात 7 हजार 148 हेक्टरचे नुकसान झालेले आहे. परंतू महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयातील फक्त अतिवृष्टी झालेल्या 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला त्या महसूल मंडळात अनुदान वितरीत करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याने सदर महसूल मंडळ अनुदानातून वगळण्यात आले. या भागातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे असून यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरू असून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, मदत व पुर्नवस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली आहे.
संजय गांधी,श्रावणबाळ,इंदिरा गांधी योजनेचे अनुदान तात्काळ द्या
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेवरून बीड आणि शिरूर कासार तहसील अंतर्गत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेतील वयोवृद्ध लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या तात्काळ दूर करून लाभार्थ्यांना दिवाळी सणाच्या अगोदर अनुदानाचे पैसे मिळाले पाहिजेत. यात दिरंगाई होता कामा नये अशा कडक सूचनाही तहसील प्रशासन व बँकेच्या अधिकार्यांना आ.संदिप क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.
सुट्ट्या असतांनाही रेशनचे धान्य दिवाळीपुर्वी वाटप करा
दिवाळी सणाला गोरगरीबांच्या घरी रेशनचे धान्य पोहचले पाहिजे. परंतू तहसीलच्या पुरवठा विभागाकडून यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. पुरवठा विभागाने व दुकानदारांनी सुट्ट्याच्या दिवशीही धान्य वितरीत करणे गरजेचे आहे. अशा सूचना आ.संदिप भैय्यांनी दिल्यानंतर तहसील प्रशासनाकडून शनिवार, रविवार, गुरूवार व शुक्रवार, रविवार या दिवशीच्या सार्वजनिक सुट्ट्यामध्ये गोदाम उघडे ठेवून सर्व स्वस्त धान्य दुकानांना शासकीय धान्य परमीट प्रमाणे वितरीत करणेबाबत व्यवस्था करावी असे पत्र तहसीलदार बीड यांनी गोदाम रक्षक, व्यवस्थापक यांना दिले आहे. धान्य वाटपात जर काळा बाजार कोणी करत असेल, गोरगरीबांना सणाच्या कालावधीत जर कोणाला धान्य दिले नाही तर थेट कारवाई करा असे निर्देशही आ.संदिप क्षीरसागर यांनी बीड आणि शिरूर कासार तहसीलदारांना दिले आहेत.