आज भाजपाच्या वतीने पंकजाताईंच्या नेतृत्वात अर्थिक मदतीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार
बीड प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टीने बाधीत पिकनुकसानीसाठी आघाडी सरकारने केवळ 365 कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पुसली आहेत. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने संपर्ण मराठवाडा अक्षरशा झोडपला. शेतकऱ्यांचे नगदी पिक कापुस, सोयाबीन, मुग, उडीद या पिकांची वाताहात झाली. संपर्ण खरीप पिकांचे वाटोळे झाले. ऐवढेच नव्हे तर या महाकाय अतिवृष्टी लाखो हेक्टर जमीन वाहुन गेली खरडुन गेली. कंबरे ऐवढ्या पाण्यात शेतकऱ्यांचे पिके तरंगली. नदी, नाले, ओढे यांना आलेल्या महापुरा मुळे शहरात आणि अनेक गावात पाणी घुसले घरांची पडझड झाली. संसार वाहुन गेले. महापुरात शेतकऱ्यांच्या समोर दुधाळ जनावरे वाहुन गेली. ऐवढा प्रचंड पाऊस आणि आतोनात नुकसान झाले असताना. सद्धा शासनाच्या अर्थिक मदत यादीतुन बीड जिल्ह्याचे नाव वगळले अतिवृष्टीच्या काळात पालक मंत्री पुनर्वसन मंत्री आणि जलसंपदा मंत्री बीड जिल्ह्यात येऊन गेले परंतु कोनत्याही मंत्र्याला पिक नुकसानीची चिंता वाटली नाही. उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांची किव आली नाही. उलट प्रशासनाला हताशी धरुन नजरी अनिवारीत घोळ घालने बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अर्थिक मदतीपासुन वंचीत ठेवले गेले. हा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवर राज्य सरकारने केलेल्या घोर अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि अतिवृष्टीने बांधीत शेतकरी बांधवांना अर्थिक मदत मिळाली पाहिजे. या न्याय हक्कासाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. खा.डॉ.प्रितमताई मुंडे. आ.लक्ष्मण अण्णा पवार, आ.नमिताई मुंदडा, आ.सुरेश अण्णा धस, माजी.आ. भिमसेन धोंडे माजी.आ.आरटी देशमुख, माजी.आ.आदिनाथ नवले पाटील, माजी.आ.केशवराव आंधळे, रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप, राजाभाऊ मुंडे, विजय गोल्हार, ॲड.सर्जेराव तांदळे,प्रा. नागरगोजे सर
सौ.उषाताई मुंडे, निळकंठ चाटे, शाम आपेट, संग्राम बांगर, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, जेडी शाह, भगीरथ बियाणी, सतिष मुंडे, अच्युत गंगणे, अरुण राऊत, पोपटराव शेंडगे, बालासाहेब चोले, स्वप्निल लगधर, भागवान केदार, प्रकाशकाका सुरवसे, ॲड.हनुमंत थोरवे, सुधीर घुमरे, डॉ.मधुसुदन खेडकर, जुगलकिशार लोहिया, आदि भाजपा जेष्ट नेत्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलण होणार आहे. तरी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने बांधीत शेतकरी बांधव भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहु संख्येने सहभागी होऊन शेतकऱ्यांचे न्याय हक्काचे हे आंदोलन यशस्वी करावे. असे अवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.