प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असल्याचे आकड्यावरुन दिसून येत आहे. आज 5237 अहवालात 193 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आष्टी, बीड व गेवराईत जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 5237 अहवालचा रिपोर्ट प्राप्त झाला यात 5041 अहवाल निगेटिव्ह आले तर 193 अहवाल पॉझिटिव्ह आले. अंबाजोगाई 08, आष्टी 46, बीड 45, धारुर 08, गेवराई 27, केज 10, माजलगाव 08, परळी 02, पाटोदा 21, शिरुर 12, वडवणी 09 असे रुग्ण जिल्ह्ाभरात आढळून आले.