जिल्हाधिकारी यांनी आज काढले नविन आदेश
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : कोव्हीड मुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहेत. त्यात कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर लग्न लावण्याच्या तयारीत अनेक जण आहेत. परंतु अजुनही जिल्ह्यात नियम शिथिल झालेले नाहीत. उलट आज काढण्यात आलेल्या नविन आदेशात जिल्हाधिकारी यांनी नविन नियम लागु केले आहेत. लग्नाचे नियोजन करत असाल तर प्रथम हे सर्व नियम पहा व नंतरच लग्नाचे नियोजन करा म्हणजे सोयीचे होईल…
पुढील आदेश येई पर्यंत बीड जिल्ह्यात खालील नियम लागु राहणार आहेत.
1) : लग्न तारखेची पुर्व नोंदणी करणे गरजेचे आहे.
2) : एका दिवसात एका मंगल कार्यालयात एकच लग्न करता येणार आहे.
3) : मंगल कार्यालय चालकांनी त्यांच्याकडे नोंद झालेल्या तारखांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे.
4) : लग्नात सहभागी होणाऱ्या 50 जणांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक पोलीसांना द्यावा लागणार आहे.
5) : लग्नात सहभागी होणाऱ्या 50 जणांची कोरोना चाचणी करणे बंधनकार आहे.
6) : लग्नांच्या ठिकाणी संबंधित विभागातील अधिकारी भेटी देऊन पाहणी करणार आहेत.
7) : लग्नाच्या ठिकाणी कोव्हीड नियमांचे पालन करणे बंधनकार आहे.
8) : राहत्या घरी जरी लग्नाचे आयोजन करायचे असेल तरीही संबंधित पोलीसांना त्यांची माहिती देणे बंधनकार आहे.
वरील सर्व नियमांचे पालन जिल्ह्यातील नागरीकांना करावे लागणार आहे. जिल्ह्यात कोव्हीडच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आज नविन आदेश काढले आहेत.