11:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून मोर्चाची होणार सुरुवात
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मराठा आरक्षण व इतर प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी आज बीड येथून पहिला बोलका मोर्चा निघणार आहे. आयोजकांकडून या मोर्चाची पुर्ण तयारी झाली असून हा मोर्चा ठिक 11:00 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून निघणार आहे. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून या मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने तसे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतिने करण्यात आले आहे. या मोर्चाकडे संपुर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी लढा देत आहे. परंतू आज पर्यंत मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागलेले दिसत नाहीत. यामुळे परत मराठा समाज न्याय हक्कासाठी आज रस्त्यावर उतरणार आहे. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मराठा समाज लोकशाही मार्गाने लढा सुरुच ठेवणार असल्याचे मत समाजातुन व्यक्त होत आहे. आज निघणाऱ्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडेही सत्ताधारी व विरोधकांचे लक्ष आहे. आज निघणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतिने तसे नियोजन करण्यात आले आहे.