अँटीग्वामधून बेपत्ता झालेला आर्थिक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे सापडला असून त्याला भारतात पाठवण्यात येईल असे अँटीग्वाचे प्रधानमंत्री गॅटसन ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की यासंदर्भात आपण डॉमिनिकाच्या प्रधानमंत्र्यांशी बोललो असून चोक्सीला परत पाठवायचे त्यांनी मान्य केले आहे. 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात भारतामधे प्रमुख आरोपी असलेल्या चोक्सीला आता अँटीग्वात प्रवेश मिळणार नाही असे ते म्हणाले. चोक्सी सध्या डॉमिनिकाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे.