– आरोग्य प्रशासन ना-लायक ठरत आहे
– अँड. अजित देशमुख
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात कोरोना काळात प्रशासन झोपले आहे का, जागे आहे, हे कळायला मार्ग नाही. अनेक वेळा सांगूनही प्रशासन सुधारायला तयार नाही. त्यामुळे कोरोणा काळात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क कोरोना पॉझिटिव असलेला रुग्ण मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि दुसऱ्या दिवशी मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे घरी जाऊन हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची खबर त्यांना देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला. ही बाब धक्कादायक असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.
कोरोणा पॉझिटिव वॉर्डातमध्ये गेल्या आठवड्यात बीडच्या सरकारी दवाखान्यात एक महिला रुग्ण ऍडमिट करून घेण्यात आली होती. हा रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याची खबर वॉर्डातील लोकांना नव्हती. त्यामुळे हा रुग्ण निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह हे समजणे आधीच त्याची ट्रीटमेंट चालू केली. उपचारा दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी वेगळा कक्ष करण्यात आला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांचा अंत्यविधी प्रशासना मार्फत केला जातो. मृतदेह किटमध्ये गुंडाळून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. मात्र नालायक प्रशासनाने या बाबी पाळल्या नाहीत. आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अंत्यविधी करण्यास सांगितले.
नातेवाइकांनी रीती रिवाजाप्रमाणे संध्याकाळी अंत्यविधी उरकला. आणि सदरचा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची भनक दवाखान्याला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोग्य विभागाचे प्रशासन मृताचे नातेवाईक यांना भेटायला जाऊन त्यांनी सदरचा रुग्ण पॉझिटिव्ह होता, हे सांगितले. एवढ्यावरच प्रशासन थांबलं नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांनी काळजी घ्यावी, रुग्ण कोरोना पॉझिटिव होता, ही बाब देखील त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या उपचाराबाबत प्रचंड वाद निर्माण झाला असून रुग्णांचे हाल होत आहेत. रेमडेसीविर इंजेक्शन वेळेवर भेटत नाहीत. त्याचप्रमाणे ऍडमिट झालेल्या रुग्णांना सेवा देखील वेळेवर मिळत नाहीत. या सर्व बाबी वारंवार समोर येत असतानाही जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व अन्य यंत्रणा सूस्त का आहे ? हे कळायला मार्ग नाही. सर्व हद्दी प्रशासनाने ओलांडल्या आहेत. अशाने जिल्ह्यात निराशेचे वातावरण निर्माण होईल.
शल्य चिकित्सक यांना एक बैठक लावून चाललेल्या काळ्या बाजाराला रोखण्यासाठी काय भूमिका असावी, या बाबत आमचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी आम्ही केली असता ते अंगाला कासरा लागु द्यायला तयार नाहीत. आम्ही रुग्ण सेवेसाठी झटत असताना हे वागणे बरोबर नाही. कोरोना रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासन जर तात्काळ सुधारले नाही, तर या प्रशासनाची विभागीय आयुक्तांकडे बैठक लावून डोळे उघडण्यासाठी कारवाई करावी लागेल. दुर्दैवाने सरकारी दवाखान्याचे आरोग्य प्रशासन ना-लायक ठरत असल्याचे म्हणावे लागतं आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाला देखील या बाबी कळवाव्या लागतील, असा इशाराही अँड. देशमुख यांनी दिला आहे.