कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी घेतला निर्णय
प्रारंभ वृत्तसेवा
परभणी: राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावत संचारबंदी लागू केली आहे. परंतु तरीही गर्दी वाढत असल्यामुळे परभणी जिल्ह्यात उद्या (ता. १७) पासून २२ एप्रिल पर्यंत पुर्ण लाॅकडाऊन लागु करण्याचा आदेश परभणीचे जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने राज्यात अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. यासह राज्य सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी यांना विशेष अधिकार दिलेले आहे. जिल्ह्यात जर जास्त रुग्ण वाढत असतील तर परिस्थिती पाहूण त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्यात आवश्यक असे निर्णय घेऊ शकतात. परभणीत गर्दी जास्त होत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली होती. यामुळे परभणीचे जिल्हाधिकारी यांनी परभणीत १७ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. यामूळे बॅंका, किराणा दुकान, भाजीपाला, फळ, बेकरी, खाद्य दुकान बंद राहणार आहेत.