अंबाजोगाई,लोखंडीसावरगाव,केजच्या रुग्णालयांना भेटी देऊन खा.प्रितमताई मुंडेंनी केल्या आरोग्य यंत्रणेला सूचना
अंबाजोगाई. -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे.कोविड महामारीत रुग्णांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ऑक्सिजन आणि औषधींचे परिस्थितीनुसार नियोजन करावे,आरोग्य व्यवस्थेवर वाढलेल्या तणावामुळे प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो आहे.परंतु रुग्णांची हेळसांड रोखण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केल्या.
अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह केज आणि लोखंडी सावरगावच्या कोविड केअर सेंटर्सला भेट दिल्यानंतर खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.तत्पूर्वी त्यांनी रुग्णालयात मिळणाऱ्या उपचार पद्धती आणि सुविधांविषयी कोरोना बाधितांशी चर्चा केली.संपूर्ण जिल्ह्यात ऑक्सिजन आणि औषधींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे नियोजन आणि समन्वयातून परिस्थितीवर मात करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
अंबाजोगाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी तालुकास्तरावर सर्व सुविधायुक्त दर्जेदार उपचार मिळणे आवश्यक आहे.तालुकास्तरावर कोविड रुग्णालयात मुबलक औषधी आणि सक्षम यंत्रणेची उभारणी केली तर जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयांवरील अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होऊ शकते.तसेच जनजागृती आणि आरोग्य शिक्षणातुन लोकांमध्ये निर्माण झालेली धास्ती कमी होईल.बीड येथे कोविड निदान लॅबच्या आवश्यकतेकडे लक्ष वेधताना रुग्णांच्या निदानासाठी ग्रामीण व खाजगी डॉक्टर्सच्या सतर्कतेचा फायदा आणि त्यांची सेवा मिळवण्याच्या प्रयत्न करावा अशा सूचना केल्या.
•••••