संभाजी सुर्वे यांच्या मागणीची ना. मुंडेंनी घेतली तूर्तास दखल
बीड प्रतिनिधि:- कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालय हे एकमेव बीड जिल्ह्यातील कोरोना चाचणी केंद्र असल्यामुळे या प्रयोग शाळेवर अधिक ताण होत होता. म्हणूनच कोरोना चाचणीचे रिपोर्ट हे येण्यास चार ते पाच दिवस विलंब लागत होता. ज्याने करुन स्व्याब दिलेले रुग्ण हे कोरोना चा रिपोर्ट येई पर्यंत अनेकांच्या संपर्कात येत आहेत. म्हणून जिल्हयातील कोरोना रुग्णाचे मीटर काय थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून भाजपाचे युवा नेते संभाजी सुर्वे यांनी कोरोना टेस्ट रिपोर्ट च्या गतीमध्ये वाढ करण्यासाठी काही तरी उपाय काढा अन्यथा आरोग्य प्रशासनाला कोर्टामध्ये उभा करू अशी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पालक मंत्री यांच्या दरबारी मागणी केली होती तशे वृत देखिल वृत्तमान पत्रातून छापून आले होते.
यावर काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालक मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी या मुद्द्या कडे विशेष लक्ष केंद्रित करुन अंबाजोगाई प्रमाणे बीड जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे नव्याने पाठऊन तो तातडीने मंजूर करून घेतला जाईल व येत्या काही दिवसातच त्यासाठीची सामग्री उपलब्ध करुन जिल्हा रुग्णालयात प्रतीदिन १२०० चाचण्यां केल्या जातील अशी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येइल अशी ग्वाही बीडच्या पालक मंत्र्यांनी दिली आहे. आता नेमके ही प्रयोग शाळा किती दिवसांत चालु होते या कडे जिल्ह्या सह भाजपा युवा नेते संभाजी सुर्वे यांचे लक्ष लागले आहे.