१५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत राज्यात लाॅकडाऊन लागण्याची शक्यता
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लाॅकडाऊनची तयारी करत आहे. परंतु यात सर्व सामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी गेल्या तीन दिवसापासून राज्य सरकारकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे. १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत राज्यात लाॅकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली असुन आज तशी घोषणा होणार असल्याची माहिती सुञांकडून मिळत आहे.
मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिवसभर विविध बैठका आयोजित केल्या होत्या. लाॅकडाऊन लागल्यानंतर सर्व सामान्यांना येणार्या अडचणी कसा सोडवल्या जाऊ शकतात यासह इतर विषयांच्या अनुषंगाने मुख्यमंञी चर्चा करुन नियोजन करताना दिसत आहेत. १५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंतच्या लाॅकडाऊनची घोषणा आज होणार असल्याची माहिती सुञांकडून मिळत आहे.
असा प्रकारे नियोजन सुरु असल्याची चर्चा
शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक लोकांना मिळेल यांची व्यवस्था करावी, रेशन दुकानांतुन तांदूळ, गव्हासोबत डाळी, साखर, तेलाचाही पुरवठा करणे, दारिद्ररेषेवरील व्यक्तींना ८ रुपये किलो प्रमाणे गहू व १२ रुपये किलो प्रमाणे तांदूळ देण्याची योजना सध्या बंद आहे ती सुरु करण्यात येणार, १० लाख नोंदणीकृत बांधकाम मजूरांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये टाकणे अशा स्वरुपाचे नियोजन केले असून वित्त विभागाने तयार केलेले पॅकेज मुख्यमंञी यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती सुञांनी दिली आहे.