गैरसोय होऊ नये यासाठी पूर्व सूचना देण्यात येणार : मुख्यमंञी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यात कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदी केल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत मुख्यमंञी यांनी व्यक्त केले. सर्व सामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दोन तीन दिवस पूर्व सूचना देण्यात येतील असेही मत त्यांनी व्यक्त केले. परंतु राज्यात जर परत लाॅकडाऊन लावला तर यात सर्व सामान्यांचे जास्त हाल होणार आहेत, यामुळे मुख्यमंञी यांनी सर्व सामान्यांसाठी विशेष मदत देण्याची गरज आहे.
राज्यात सर्वञ कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंञणा कमी पडत आहे. यामुळे शनिवारी मुख्यमंञी यांनी आॅनलाईन सर्व पक्षीय बैठक आयोजीत केली होती. उपमुख्यमंञी अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महसूलमंञी बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंञी अशोक चव्हाण, गृहमंञी दिलीप वळसे पाटील, नगरविकासमंञी एकनाथ शिंदे, जलसंपदामंञी जयंत पाटील, आरोग्यमंञी राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंञी अमित देशमुख, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. यावेळी सर्वांनी आपआपले मत व्यक्त केले. मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे मत जाणून घेतले. यासह सर्व बाबींचा विचार करुन दोन दिवसात लाॅकडाऊनचा निर्णय होणार आहे.