खा.बजरंग सोनवणे यांचे सारथी प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड व दीपक देशमुख यांच्या उपस्थितीत
परळी प्रतिनिधी – परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ खा. बजरंग सोनवणे यांचा झंजावाती दौरा सुरू असून, कालही त्यांनी शहरातील विविध प्रभागामध्ये जाऊन, प्रचार केला. यावेळी, संपूर्ण परळी शहर शरद पवार गटाच्या पक्षाचे राष्ट्रवादीमय झाले होते. प्रत्येक प्रभागांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार रॅलीत होता. महिलांची उपस्थिती तर माध्यमांनी दखल घ्यावी अशी होती. परळीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना खासदार बजरंग सोनवणे यांनी केले. दरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्यांनी दहशतमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त परळी तसेच स्वच्छ आणि निर्मळ परळी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, दीपक नाना देशमुख,तालुका अध्यक्ष बाबा शिंदे, उत्तम माने यांनी परळीच्या विकासासाठी परळी नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या हाती द्यावी. असे मतदारांना आवाहन केले. शहरातील कीर्ती नगर, कृष्णा नगर, खुदबे नगर, भीम नगर , जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगर , अपना चौक , सावता माळी मंदिर परिसर, खंडोबा, नगर गंगासागर नगर,नांदूरवेस आदी नगरांमध्ये त्यांनी झंजावाती दौरा केला. प्रभाग क्रमांक ५ मध्ये सोनाली भारत टाक ,ॲड.सतीश बाळासाहेब देशमुख, प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवार कुरेशी आरेफा बेगम महबूब पाशा ,बागवाले नितिन मानिक, प्रभाग क्रमांक ४ मधील उमेदवार अशोक सुदाम तरकसे, पांडे अनिता बबन , प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार सौ.मंदाकिनी मन्मथ जठार व दिपक रंगनाथ देशमुख, प्रभाग क्रमांक १५ मधील उमेदवार शेख शारेफ शफिक व सिमा रावसाहेब देशमुख, आदी उमेदवारांच्या प्रचारार्थ या संपूर्ण नगरांमधून व प्रभागामधून मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहून, परिवर्तन अटळ असल्याचे चित्र यावेळी दिसले. यावेळी , ज्येष्ठ नेते उत्तम माने,जीवनराव देशमुख,अमर रोडे, मुकुंद देशमुख, मनोज जठार, प्रकाश देशमुख , गणेश देशमुख, महिला तालुकाध्यक्ष वर्षा रायभोळे,आदी पदाधिकारी व या रॅलीस नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















