सर्वच कॉर्नर बैठकांना विराट सभेचे आले होते स्वरूप
बीड प्रतिनिधी : बीड शहराचा सर्वांगीण विकास करून दाखवितो फक्त एक संधी द्या आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वराज्य नगर, धोंडीपुरा, बाबाचौक इस्लामपुरा आदी भागात प्रचार सभेत बोलताना प्रतिपादन केले आहे. तर या बैठकांना मिळालेला प्रतिसाद हा एक प्रकारे विजयी सभे प्रमाणे दिसत असल्याने बीडमध्ये तुतारीच वाजणारा असे मतदारांनी ठरविल्याचे प्रतिसादावरून दिसून येत आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. संदीप क्षीरसागर हे बीडमध्ये एकटेच लढत आहेत. ते दररोज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आ.क्षीरसागर दररोज वेगवेगळ्या प्रभागात जाऊन कॉर्नर सभा घेत आहेत. या कॉर्नर सभांना मतदारांचा उत्साहपूर्ण असा प्रतिसाद मिळत असल्याने बीडमध्ये तुतारीच वाजणार असे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी (दि.२६) रोजी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. स्मिता विष्णू वाघमारे तसेच प्रभाग क्रं.25 च्या उमेदवार विद्या गोरक्ष गायकवाड, विजय बळीराम लव्हाळे यांच्या प्रचारार्थ स्वराज्य नगर येथे कॉर्नर सभा, प्रभाग क्रं.07 उमेदवार सुरेखा संदिप साळुंके, किशोर नारायणराव काळे यांच्या प्रचारार्थ धोंडीपुरा येथे कॉर्नर सभा तर प्रभाग क्रं.20 मध्ये बाबा चौक, इस्लामपुरा भागात शेख शाहानूरबी खाजामिया, शेख सरफराज शेख अब्दुल सलाम यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेतल्या आहेत. या कॉर्नर सभा नव्हे तर विजयी सभा होत्या अशी चर्चा गर्दी पाहून सुरू होती. यावेळी आ. संदीप क्षीरसागर बोलताना म्हणाले की, आता अनेकजण विकासाच्या थापा मारत आहेत. पण कामाला आम्हीच रस्त्यावर असतोत. विकास काय असतो हे मी दाखवून देतो. तुमच्या मनातील बीड शहराचा सर्वांगीण विकास करू, फक्त एक संधी द्या असे सांगत आ.संदीप क्षीरसागर यांनी शेवटी त्यांनी येत्या २ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि सर्व उमेदवारांना तुतारी आणि मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून विकास आणि कामे करणाऱ्यांना बळ द्या असे आवाहन केले. यावेळी त्यांचे सर्व पदाधिकारी उमेदवार यांच्या सह बीडचे विकास प्रिय मतदार बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

















