गेवराई : आजचे युग हे युवाशक्तीचे युग आहे. आजचा तरुण सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे लक्ष ठेऊन असून त्याची दिशाभूल करने शक्य नाही. युवाशक्ती ला सोडून कोणतेच काम होऊ शकत नाही. म्हणून शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन युवाशक्ती परिवर्तन घडवेल. असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. ते गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित युवक मेळाव्यात बोलत होते.
गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, आजचे युग हे युवकांचे युग असून तरुणांना डावलून काहीच होऊ शकत नाही. या युवाशक्ती ला गल्ली बरोबर दिल्लीतील घडामोडी ही लगेच माहिती होता. आजचा तरुण जागतिक पातळीवरील प्रश्नावर ही व्यक्त होऊ लागला आहे. त्यांच्यातील या शक्तिचा विधायक कामासाठी वापर झाला पाहिजे. या युवकांनी आपले घर, परिसर व शहराच्या विकासासाठी या निवडणुकीत विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या ताधिक्याने निवडून देऊन गेवराई मध्ये परिवर्तन घडवील. विरोधक आपल्याला भावनिक करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. ही निवडणूक विकासाऐवजी भावनिक मुद्द्यावर ढकलायचा प्रयत्न करतील परंतु आपण मात्र विकास, सुरक्षितता व सामाजिक सलोखा यासाठी घड्याळाच्या उमेदवाराला निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्हा युवक अध्यक्ष बळीराम गवते म्हणाले की, शिवछत्र परिवार हा सर्वांना समान न्याय देणारा परिवार आहे. त्यांनी सर्व जाति धर्माला उमेदवारी दिली आहे.
माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे म्हणाले की, साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य माणसावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवील. पवारांनी विकासकामात भेदभाव केलेला आहे. कित्येक कामे प्रलंबित आहेत. तुम्ही कोणत्याही वेळेला व कोणत्याही ही ठिकाणी मला बोलला मी सदैव उपस्थित राहणारा व्यक्ती आहे. साहेबांनी स्वतः च्या घरातील उमेदवार न देता सामान्य माणसाला उमेदवारी देऊन त्यांची तळमळ दाखवून दिली आहे. मला पाडण्यासाठी एकमेकांना शिव्या देणारे पवार व पंडित एकत्र आले यातच सर्व काही आले.
सरपंच संघटनेचे अध्यक्ष कालिदास नवले म्हणाले की, जसे माजी आमदार आमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सभा घेत होते तसेच आम्ही गेवराई शहरातील सभेला उपस्थित असतो. साहेबांनी असा उमेदवार दिला आहे की, पवारांचा ‘किल्ला’ आपल्याकडे येऊन तिकडे फक्त ‘बाल’ राहीले आहेत.
आरपीआयचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर म्हणाले की, पवारांना रात्र-दिवस फक्त साहेबच दिसतात. यांचे भाषण साहेबांपासून सुरू होऊन साहेबांवरच संपते. जि.प. ला समाजाचा एक ही उमेदवार न देणारा पवार आता मात्र मी अर्ज मागे घ्यावा यासाठी मा. पप्पू कागदे यांचे पाय धरत आहे. पवारांनी कोरोना काळात दारावर आलेल्या लोकांना हाकलून दिले आहे. हे लोक विसरले नाहीत.
पृथ्वीराज पंडित म्हणाले की, युवक हेच माझी शक्ती आहेत. पवारांनी कार्यकर्त्यांना अंगावर न घालत दम असेल तर स्वतः समोर यावे. माझा हात तुमच्या काठी पेक्षा मोठा आहे.
रणवीर पंडित म्हणाले की, आमचा सिंघम सर्वांना पुरून उरणारा आहे. आपले नेते अजित पवार हे अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे नेते आहेत. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ च्या वतीने मुस्लिम समाजातील तरुणांना कोट्यावधी चा निधी मंजूर करुन दिला आहे. त्यामुळे घड्याळाच्या उमेदवाराला निवडून द्यावे.
यावेळी नवीद मशायक, संतोष सुतार, दादासाहेब चौधरी यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास
सर्व प्रभागांमधील उमेदवार व विनोद सौंदरमल, मोहसीन भाई, अरुण चाळक, बाबा घोडके, मनोज धापसे, अमर बोराडे, विशाल भालशंकर, नंदू दाभाडे, रघुनाथ आतकरे, दिनेश मोटे, अक्षय पवार, समाधान मस्के, सचिन दाभाडे, जयसिंग माने, स्वप्निल मस्के, दादा बेदरे, शिवराज पवार, विठ्ठल खंडागळे, जाफर पटेल, शेख सलीम, अजय रुकर, अल्ताफ कुरेशी, सय्यद शेख, दीपक धुरंदरे, अभिषेक सुतार, अभिजीत शिंदे, पृथ्वीराज सुतार, दत्ता दोडके, साहिल दोडके, अशोक दोडके, जीवन साळवे, अनिकेत कांडेकर, विनोद गायकवाड, महादेव सुंदर, अनिकेत कांडेकर, शंतनू निकाळजे, सुमित भोले, नितीन सोनवणे, मिलिंद सोनवणे, विपुल कांडेकर, धनंजय कांडेकर, सिद्धार्थ कांडेकर अर्जुन सौंदरमल, अंशू पोटभरे, अभिषेक कांडेकर, भैय्या सावंत, यशपाल शिंदे, सोहेल अत्तार, विजय बोराडे, अनिल बोराडे, संतोष सुतार, रवी कानडे, यश सौंदरमल, अमित सौंदरमल, करण जगदाळे, ओम गायकवाड, करण काळे, गणेश काळे, राघोजी साळवे, प्रकाश साळवे, जीवन साळवे, अनिकेत सौंदरमल, नितीन कांडेकर, सुमित कांडेकर यांच्यासह हजारो युवक मतदार उपस्थित होते.
![]()

















