बीड प्रतिनिधी:- प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भारत भास्कर कांबळे, मंगलाबाई संजय चांदणे तसेच वॉर्ड क्रमांक १४ मध्ये कल्याणी अशोक राजपुरे, धम्मप्रिया रवी वाघमारे (मित्र पक्ष शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या प्रचारार्थ बलभीम नगर, पेठ बीड आणि धानोरा रोड भागात सभा घेतली. तसेच वॉर्ड क्रमांक ११ मधील उमेदवार मोमिन खमरूनिसा शरफुद्दीन (मोहसीन मेंबर), पठाण अफसर खान करीम खान (अय्युबबाई) यांच्या प्राचारार्थ बालेपीर भागात सभा घेतली. यावेळी हजारोंच्या संख्येने या भागातील मतदार बांधव उपस्थित होते.
आमचे सर्व उमेदवार हे लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे आहेत. समोरचे उमेदवार कितीवेळा लोकांसाठी रस्त्यावर आले आणि लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या? याचाही मतदार बांधव विचार करणार आहेत. आम्ही लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही लोकांच्या दारात गेलो. बीडकरांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला, आम्ही उन्हात थांबून २० ते २५ दिवसांना येणारे पाणी आम्ही ८ दिवसांना येईल असे नियोजन केले.
















