व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अमर नाईकवाडे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड)
बीड । प्रतिनिधी : बीड नगरपरिषदेच्या निवडणूक वातावरणाला वेग आला असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचा बीड शहर दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. वैष्णव पॅलेस, बीड येथे सोमवार सायंकाळी 5 वाजता आयोजित व्यापारी मेळाव्यात अजित दादा पवार हे शहरातील व्यापारी बांधवांशी थेट संवाद साधणार असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संवाद विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांनी पत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले की, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 53 उमेदवारांना बळकटी देण्यासाठी, तसेच व्यापारी बांधवांच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
“हा व्यापारी मेळावा म्हणजे केवळ संवाद नव्हे, तर बीडच्या व्यापारी वर्गासाठी दिशा ठरवणारा निर्णायक टप्पा आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी, व्यावसायिक संघटनांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा,” असे आवाहन शहराध्यक्ष अमर नाईकवाडे यांनी केले आहे.
















