महामार्गसाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मावेजा देण्याचीही केली मागणी
बीड प्रतिनिधी :- बीड विधानसभा मतदारसंघातील रस्ते आणि इतर विकास कामांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजित दादा पवार यांच्याकडे मागणी केली असता, ना.अजितदादांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोरच सूचना देऊन बीड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठीची सकारात्मकता स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार २ दिवस बीडमध्ये आलेले आहेत. या दोन दिवसांत ना.अजितदादांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न आणि बाबींकडे बैठकांच्या माध्यमातून नियोजन सुरू केले आहे. या अनुषंगाने गुरूवारी (दि.७) रोजी झालेल्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील विकासाचे विविध प्रश्न आणि प्रस्ताव बैठकीत ना.अजितदादांसमोर मांडले असता, ना.अजितदादांनी जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावांच्या संदर्भात सकारात्मक सूचना दिल्या.
चौकट
*ना.अजितदादांनी पुढील कामांबाबत दर्शवली सकारात्मकता*
• राष्ट्रीय महामार्ग 211 (नवीन क्र.52) महालक्ष्मी चौक ते जालना रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता या दोन्ही साईडने सहा (6) लाईन रोडसाठी व दोन्ही साईडने ड्रेनेजसाठी मा.अजित दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या.
• शिवशारदा ते अमरधाम स्मशानभुमी पर्यंत भुयारी गटारसाठी मा.दादांनी तत्त्वत: सूचना दिल्या.
• ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा खोली, अंगणवाडी बांधकाम, पाणी पुरवठा व्यवस्था, जनसुविधे अंतर्गत स्मशानभुमी बांधकाम, पशु वैद्यकीय दवाखाने, वन विभागाचा विकास, कोल्हापुरी पद्धतीने बंधरे, सिमेंट नाला बंधारे या व इतर आवश्यक असलेले विकास कामे होणे बाबत आ.क्षीरसागरांनी निवेदनासह मागणी केली असता ना.अजितदादांनी सकारात्मकता दर्शविली.
*बीड शहरातील जिव्हाळ्याचा असलेला रस्त्यांचा प्रश्नही मार्गी लावण्याची केली मागणी*
बीड शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील रहदारीसाठी रस्त्यांच्या अवस्थेमुळे मोठी अडचण होत आहे. बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा झाला आहे. त्यामुळे ना.अजितदादांकडे शहरातील रस्त्यांचा विकासासंदर्भात प्रस्ताव देऊन आ.क्षीरसागर यांनी बीड शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
आ.क्षीरसागर यांनी पालवण चौक ते नगर रोड (धानोरा रोड), मदर टेरेसा चौक ते कालिका नगर कमान (अंकुशनगर मुख्य रस्ता), बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र. 7 मध्ये बलभीम चौक ते धोंडीपुरा मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजुरी वेस पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये कारंजा टावर ते पिंगळे गल्ली ते बुंदेलपुरा मस्जिद रोड पर्यंत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.08 मध्ये राजुरी वेस ते बलभीम चौक व राजुरी वेस बुंदेलपुरा मार्ग कबाड गल्ली पर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे, बीड न.प.अंतर्गत प्रभाग क्र.8 मध्ये राजुरीवेस-बुंदेलपुरा-कबाडगल्ली मार्गे माळीवेस सिमेंट रस्ता करणे. या कामांना मंजुरी देण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
*राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते राजूरी (न.) रस्त्याच्या भूसंपादनचाही मांडला प्रश्न*
बीड मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ गेला आहे. या महामार्गासाठी खरवंडी ते राजूरी नवगण पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. परंतु संपादनाचा शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही. विकास कामांसाठी शासनाला जमीन संपादित करूनही मावेजावाचून शेतकरी बांधवांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने ना.अजितदादांनी हा प्रश्न मार्गी लावून जमीन संपादित झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची मागणीही आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.