बीड : मस्सा जोग ता. केज येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज डॉ. श्रीकृष्ण पंचाळ जिल्हाधिकारी बीड यांनी केज येथील तहसील कार्यालयात एक बैठक घेतली व सदर प्रकरणाचा जलद गतीने तपास करण्याचे निर्देश जारी केले.
सदर प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित आरोपी विरुद्ध कायदेशीर कार्यवाही अनुसरण्याची दक्षता घेण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.