शिवसेना जिल्हप्रमुख मुळूक, गलधर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
बीड प्रतिनिधी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यभर हे प्रकरण गाजत असून याचा तपास सीआयडीमार्फत करुन मुख्य सुत्रधारास अटक करावी व बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर यांनी शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे दुपारी अपहरण करुन हत्या करण्यात आली. घटनेच्या दोन दिवस अगोदर देशमुख आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर थातूर-मातूर कारवाई करून आरोपीला पाठीशी घातले. त्यानंतर दोनच दिवसांनी सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या कट रचून अपहरण करून निर्घणपणे हत्या करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येचे जिल्हयात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी नऊ तास रास्तारोको करण्यात आला. यामुळे हे प्रकरण राज्यभरात गाजत असून सरपंच देशमुख यांच्या हत्येमागे कोणाकोणाचा हात याचा तपास लागणे गरजेचे आहे. यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन प्रकरणाचा सीआयडीमार्फत तात्काळ करुन मुख्य सुत्रधारास अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर यांनी शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.