बीड प्रतिनिधी : केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवरील सरकार एका विचाराचे असेल तर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा व आपली सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी बीड जिल्हा शिवसेनेच्यावतीने आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते. युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, व्हीजेएनटी ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे, किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप सोनवणे, अविनाश जाधव, सुमित कोळपे, अजय सुरवसे, शेखर पवार, महायुतीचे प्रचार समन्वयक डॉ.शादुर्ल भणगे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रत्नमाला आंधळे, सहसंपर्क प्रमुख सुमन गोरे, सुरेखा माने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर पुढे म्हणाले की, विधानसभेनंतर होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. मागील आमदाराने मतदारसंघातील बिल्डर लॉबी, शासकीय अधिकारी व कर्मचारी व सर्वसामान्य जनतेलाही वेठीस धरले. अगदी जमिनीचे फेरफार देखील माझ्याशिवाय करायचे नाहीत असे तहसीलदारांना सांगणारा पहिला आमदार राज्याने पाहिला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून मंगेश चिवटे व बाजीराव चव्हाण यांनी आपल्या भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत मिळवून दिली. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीतच युवा सेना कार्यकर्त्यांचा भरगच्च मेळावा घेऊन शिवसेनेचा अत्यंत चांगला, निटनेटका, देखना व शिस्तबध्द कार्यक्रम केल्याबद्दल त्यांनी युवा सेना पदाधिकार्यांचे कौतूक केले. धर्मवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण यांनी मराठवाड्यात युवा सेनेचे अत्यंत चांगले संघटन केले आणि त्याचे दर्शन आजच्या या मेळाव्यात घडले. त्यामुळे भविष्यात बाजीराव चव्हाण यांच्याकडे शिवसेनेची मोठी जबाबदारी येवू शकते असे संकेत आज मला मिळाले आहेत अशा शब्दात त्यांनी बाजीराव चव्हाण यांचे कौतूक केले. जनतेला या त्रासातून मुक्त करण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परिवर्तन होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. मेळाव्यास भिमराव वाघचौरे, कृष्णा यादव, प्रदिप लगडे, कपील जोगदंड, विलास मस्के, अजित देशमाने, गणेश चव्हाण, आण्णा शिंदे, दिनकर शिंदे, फुलचंद नेवाळे, कृष्णा जाधव, पंकज कदम, संदीप माने, ज्योतीराव फरताडे, महेश साळुंके, बालाजी बहिरवाळ, विश्वास चव्हाण, विश्वनाथ जाधव, राजेंद्र लगडे, गणेश नेवाळे, नंदेश चौरे, कृष्णा वायकर, अरविंद जाधव यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाजीराव चव्हाण, बाळासाहेब किसवे, अमरसिंह नाईकवाडे, डॉ.रमेश शिंदे, सुरज चुंगडे यांचीही भाषणे झाली. यावेळी बाळासाहेब किसवे, अमर नाईकवाडे, डॉ.रमेश शिंदे, सुरज चुंगडे यांचीही भाषणे झाली. अजय सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. निराजी जुळे यांनी सुत्रसंचालन केले. विलास सातपुते यांनी आभार मानले.
चौकट
विकासाची दृष्टी असलेले योगेश क्षीरसागर बीडचा विकास करतील -बाजीराव चव्हाण
बीड विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या खूप चांगला आहे. मात्र येथे पिण्याचे पाणी व सिंचनासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. या भागामध्ये एमआयडीसी आणून औद्योगिक क्षेत्राचा विकास करता येईल. उद्योग धंदे वाढीस लागतील. त्यामुळे ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्याचे चित्र बदलेल आणि हे काम डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासारख्या उच्चशिक्षित व विकासाची दृष्टी असलेले उमेदवारच करू शकतात. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी आम्ही सोबत आलो आहोत, असे बाजीराव चव्हाण म्हणाले.